सलमानसोबतच्या लग्नावर युलिया वंतूरने म्हटले, ‘आपण जसा विचार करतो तसे घडत नसते’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 20:20 IST2018-01-16T14:50:13+5:302018-01-16T20:20:13+5:30
गेल्या तीन वर्षांपासून ऐकावयास मिळत आहे की, सलमान खान आणि युलिया वंतूर एकमेकांना डेट करीत आहेत. सलमान प्रत्येक इव्हेंटमध्ये ...

सलमानसोबतच्या लग्नावर युलिया वंतूरने म्हटले, ‘आपण जसा विचार करतो तसे घडत नसते’!
ग ल्या तीन वर्षांपासून ऐकावयास मिळत आहे की, सलमान खान आणि युलिया वंतूर एकमेकांना डेट करीत आहेत. सलमान प्रत्येक इव्हेंटमध्ये युलियाला सोबत घेऊन जात असतो. युलियादेखील बºयाचदा सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बघावयास मिळाली आहे. त्यामुळे यासर्व गोष्टींचा विचार करता सलमान आणि युलिया रिलेशनशिपमध्ये असावेत हेच स्पष्ट होते. कदाचित याच कारणामुळे त्यांच्या लग्नावरून चर्चा रंगत असावी. परंतु सलमानने नेहमीच अशाप्रकारच्या चर्चेतून काढता पाय घेतला आहे. त्याला जर युलियाविषयी काही प्रश्न विचारला तर तो लगेचच घूमजाव करतो. मात्र नुकतेच एका प्रसिद्ध वृत्तपत्राशी युलियाने चर्चा करताना या विषयावर बिंधास्तपणे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सलमानसोबतच्या लग्नावरून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना युलियाने म्हटले की, खरं तर मला या गॉसिपबद्दल माहिती आहे. परंतु त्यातील बºयाचशा चर्चांमध्ये सत्यतता नाही. परंतु अशातही मी लोकांचे तोंड बंद करू शकत नाही. मी सलमानचा आदर करते. मला माहीत नाही की, माझे आयुष्य मला कुठे घेऊन जाईल. कारण आपण जसा विचार करतो, तसे नेहमी घडत नसते.’
![]()
खरं तर युलियाच्या या बोलण्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे युलिया सलमानला लाइफ पार्टनरपेक्षा एक चांगला मित्र म्हणून बघते. याबद्दल युलिया सांगते की, ‘मी कधीच भारतात येऊन काम करण्याचा विचार केला नाही. सलमान माझा चांगला मित्र आहे. त्याने मला नेहमीच गाइड केले आहे. गाण्यासाठी त्याने मला प्रोत्साहन दिले. मी तर कधी विचारही केला नव्हता की, मी बॉलिवूडचा भाग बनणार, हिंदी गाणे गाणार. अर्थात या सर्वांसाठी मला सलमानचा पाठिंबा मिळाला.’ असेही तिने सांगितले.