‘सिम्बा’च्या सेटवर रणवीर सिंगने घेतला करण जोहरचा ‘किस’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 18:18 IST2018-09-09T18:13:14+5:302018-09-09T18:18:02+5:30
रणवीर सिंगच्या ‘सिम्बा’ या चित्रपटाचे शूटींग सध्या जोरात सुरू आहे. बॉलिवूडचा मोस्ट एनर्जीटिक अॅक्टर म्हणून मिरवणारा रणवीर या चित्रपटाबद्दल कमालीचा उत्सूक आहे. त्याची ही उत्सुकता त्याच्या वेगवेगळ्या कृतीतून दिसतेय.

‘सिम्बा’च्या सेटवर रणवीर सिंगने घेतला करण जोहरचा ‘किस’!!
रणवीर सिंगच्या ‘सिम्बा’ या चित्रपटाचे शूटींग सध्या जोरात सुरू आहे. बॉलिवूडचा मोस्ट एनर्जीटिक अॅक्टर म्हणून मिरवणारा रणवीर या चित्रपटाबद्दल कमालीचा उत्सूक आहे. त्याची ही उत्सुकता त्याच्या वेगवेगळ्या कृतीतून दिसतेय. अलीकडे ‘सिम्बा’च्या सेटवर असेच काही झाले. कदाचित ‘सिम्बा’च्या सेटवर असे काही झाले की, आपला आनंद व्यक्त करण्यापासून रणवीर स्वत:ला रोखू शकला नाही. मग काय, आनंदाच्या भरात त्याने चित्रपटाचा निर्माता करण जोहर याच्या गालावर किस केले. यावेळी हजर असलेल्यांनी हा क्षण लगेच कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला. रणवीरनेही हा फोटो शेअर केला.
‘आमच्याकडे प्रेमचं प्रेम मिळेल. ‘सिम्बा’च्या सेटवरचा एक खास क्षण, ’ असे त्याने लिहिले. नंतर हा फोटा ‘सिम्बा’ची हिरोईन सारानेही आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला. रणवीर करणला किस करतोय आणि त्याचवेळी सारा व रोहित शेट्टी त्याला तसे करण्यापासून रोखताहेत, असा हा मजेशीर फोटो आहे.
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ पुढील वर्षी २८ डिसेंबरला रिलीज होतोय. यात सैफ अली खानची मुलगी सारा अली खान लीड रोलमध्ये आहे.
‘सिम्बा’मध्ये रणवीर सिंग संग्राम भालेराव या पोलिस अधिका-याची भूमिका साकारताना दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ हा सिनेमा तेलगू चित्रपट ‘टेंपर’चा रिमेक आहे. पण रोहित शेट्टीचे मानाल तर हा पूर्णपणे ‘टेंपर’चा रिमेक नसेल. केवळ २० टक्के भाग ‘टेंपर’मधून घेतला जाईल. उर्वरित चित्रपट बॉलिवूड प्रेक्षकांना डोळ्यांपुढे ठेवून बनवला जाईल.