अन् पापा जॅकी श्रॉफ यांच्यामुळे टायगर श्रॉफने बदलला इतका मोठा निर्णय!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 10:31 AM2019-01-22T10:31:54+5:302019-01-22T10:33:29+5:30

हॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स स्वीकारण्याचा विचार टायगरने केला होता. पण अचानक त्याने आपला हा विचार बदलला. कारण काय, तर पापा जॅकी श्रॉफ .

tiger shroff hold his hollywood debut after his father jackie shroffs advise | अन् पापा जॅकी श्रॉफ यांच्यामुळे टायगर श्रॉफने बदलला इतका मोठा निर्णय!!

अन् पापा जॅकी श्रॉफ यांच्यामुळे टायगर श्रॉफने बदलला इतका मोठा निर्णय!!

googlenewsNext
ठळक मुद्देतूर्तास बॉलिवूडमध्ये टायगरचे अनेक प्रतिस्पर्धी आहेत. टायगर हॉलिवूडमध्ये बिझी झाला तर बॉलिवूडचे हे प्रतिस्पर्धी कितीतरी दूर निघून जातील. जिथे त्यांना गाठणे कदाचित टायगरला शक्य होणार नाही.

बॉलिवूडच्या नव्या पिढीचा अ‍ॅक्शन स्टार टायगर श्रॉफ सध्या यशाच्या शिखरावर आहे. गतवर्षी ‘बागी 2’सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा दिल्यानंतर टायगर यंदा ‘स्टुडंट आॅफ द ईअर 2’ सारखा बिग बजेट चित्रपट घेऊन येणार आहे. यासोबतचं अन्य एका चित्रपटात हृतिक रोशन व त्याची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही चित्रपट आत्ताच हिट मानले जात आहे. साहजिकचं टायगरची ख्याती विदेशातही पोहोचली आहे आणि त्याचमुळे टायगरकडे अनेक हॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. यापैकी एखाद-दोन हॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स स्वीकारण्याचा विचार टायगरने केला होता. पण अचानक त्याने आपला हा विचार बदलला. कारण काय, तर पापा जॅकी श्रॉफ .


होय, पापा जॅकी श्रॉफ यांचा सल्ला मानून टायगरने या हॉलिवूड चित्रपटांना नकार दिला. आधी बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक अढळ स्थान निर्माण कर आणि नंतर हॉलिवूडबद्दल विचार कर. इतकी घाई करू नकोस, असा सल्ला जॅकी यांनी म्हणे टायगरला दिला. टायगरला पापाचा हा सल्ला पटला आणि त्याने आपले हॉलिवूड प्रोजेक्ट होल्डवर ठेवणेचं योग्य समजले.


तूर्तास बॉलिवूडमध्ये टायगरचे अनेक प्रतिस्पर्धी आहेत. वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, रणवीर सिंग, रणबीर कपूर असे सगळे. टायगर हॉलिवूडमध्ये बिझी झाला तर बॉलिवूडचे हे प्रतिस्पर्धी कितीतरी दूर निघून जातील. जिथे त्यांना गाठणे कदाचित टायगरला शक्य होणार नाही. कदाचित ही गोष्ट टायगरला पटली. तुम्हाला ही गोष्ट किती पटते, ते नक्की सांगा.
तूर्तास टायगर ‘स्टुडंट आॅफ द ईअर 2’मध्ये बिझी आहे. यात तो अनन्या पांडे आणि तारा सुतारियासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

Web Title: tiger shroff hold his hollywood debut after his father jackie shroffs advise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.