रवीना टंडन, तुझा इशारा मिसेस फनीबोन्सकडे तर नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 09:49 AM2018-10-03T09:49:46+5:302018-10-03T09:50:30+5:30

९० चे दशक गाजवणारी अभिनेत्री रवीना टंडन हिने अलीकडे तनुश्री दत्ता व नाना पाटेकर वादात तनुश्रीची पाठराखण करत, पतीच्या चुका पदराआड लपवणाऱ्या इंडस्ट्रीतील तमाम पत्नींवर निशाणा साधला होता.

tanushree nana controversy raveena tandon asked to stop supporting their husbands bad habits netizens links her tweet to twinkle akshay kumar | रवीना टंडन, तुझा इशारा मिसेस फनीबोन्सकडे तर नाही ना?

रवीना टंडन, तुझा इशारा मिसेस फनीबोन्सकडे तर नाही ना?

googlenewsNext

९० चे दशक गाजवणारी अभिनेत्री रवीना टंडन हिने अलीकडे तनुश्री दत्ता व नाना पाटेकर वादात तनुश्रीची पाठराखण करत, पतीच्या चुका पदराआड लपवणाऱ्या इंडस्ट्रीतील तमाम पत्नींवर निशाणा साधला होता. ‘वर्कप्लेस हरेसमेंट काय असते? इंडस्ट्रीतील सर्व बायका आणि गर्लफ्रेन्ड त्यांच्या डोळ्यांदेखत एखाद्या हिरोईनचे करिअर उद्धस्त होताना बघतात. पण हे बघूनही आपल्या पतीला वा बॉयफ्रेन्डला एका शब्दानेही बोलत नाहीत, अनेक अभिनेते स्वत:च्या मौजमज्जेसाठी कुण्या मुलीचे करिअर ध्वस्त करतांना एक क्षणही विचार करत नाहीत. लहान-सहान गोष्टींवरून हिरोईनला रिप्लेस केले जाते,’असे ट्विट रवीनाने केले.




आपल्या या ट्विटमध्ये रवीनाने कुणाचेच नाव घेतले नाही़. पण कदाचित तिचा इशारा लोकांनी समजला. होय, रवीनाने हे ट्विट करताच नेटक-यांनी त्याचा संबंध थेट अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नासोबत जोडणे सुरू केले. (अक्षय कुमाररवीना टंडन ही जोडी ९० च्या दशकातील सर्वात चर्चित जोडी होती. रवीना टंडनसोबत ब्रेकअप केल्यानंतरचं अक्षयने २००१ मध्ये ट्विंकल खन्नासोबत लग्न केले होते.)




अनेक युजर्सनी रवीना तुझा इशारा मिसेस फनी बोन्स(ट्विंकल खन्ना) आणि अक्षय कुमारकडे तर नाही ना? असा थेट सवाल रवीनाला केला. 



तर अनेकांनी रवीनाच्या या ट्विटवर मिसेस फनीबोन्स उत्तर देणार का? असा तिरकस प्रश्न विचारून ट्विंकलला या वादात ओढण्याचा प्रयत्न केला.
तूर्तास बॉलिवूडमध्ये तनुश्री दत्ता- नाना पाटेकर वाद गाजतो आहे. २००८ मध्ये नाना पाटेकर यांनी ‘हॉर्न ओके प्लीज’या चित्रपटाच्या सेटवर आपल्याशी गैरवर्तन केले होते, असा आरोप तनुश्री दत्ताने केला आहे. तनुश्रीच्या आरोपानंतर बॉलिवूडच्या अनेकांनी तिला पाठींबा दिला आहे. रवीना टंडनही तनुश्रीच्या बाजूने मैदानात उतरली होती. ‘पुन्हा एकदा इंडस्ट्री आपल्याच लोकांना वाचवण्यात अपयशी ठरली. आपल्याला एक संधी मिळाली होती. पण आपण ती गमावली. इंडस्ट्री महिला सक्षमीकरणावर सिनेमे बनवते. पण ही शुद्ध फसवणूक आहे. तनुश्री प्रकरणात इंडस्ट्री ज्याप्रमाणे मूग गिळून गप्प आहे, त्यावरून तरी हेच दिसते,’ असे ट्विट रवीनाने केले होते.

Web Title: tanushree nana controversy raveena tandon asked to stop supporting their husbands bad habits netizens links her tweet to twinkle akshay kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.