सुशांत सिंग राजपूत अन् क्रिती सॅनन यांनी नात्यात घेतला ब्रेक! हे आहे कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 19:48 IST2018-07-22T19:29:18+5:302018-07-22T19:48:26+5:30
सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सॅनन यांच्या अफेअरची चर्चा नवी नाही. पण सध्या आता क्रिती व सुशांतचे नाते ‘ब्रेक’वर असल्याचे कळतेय.

सुशांत सिंग राजपूत अन् क्रिती सॅनन यांनी नात्यात घेतला ब्रेक! हे आहे कारण!!
सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सॅनन यांच्या अफेअरची चर्चा नवी नाही. पण सध्या आता क्रिती व सुशांतचे नाते ‘ब्रेक’वर असल्याचे कळतेय. होय, ताजी चर्चा तरी तशीच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तूर्तास सुशांतला आपल्या कामावर फोकस करायचा आहे. करिअरच्या या टप्प्यावर आपली आपल्या कामामुळे चर्चा व्हावी, अफेअरमुळे नाही, असे त्याचे मत आहे. सध्या केवळ कामाला आणि कामाला प्राधान्य द्यावे, असे त्याचे मत पडलेय. साहजिकच त्याने क्रितीला त्याचे हे मत सांगितले आणि मग सांमजस्याने दोघांनीही काही काळ ब्रेक घेऊन आपआपल्या कामावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला.
सध्या सुशांत जमशेदपूर येथे ‘किजी आरै मैनी’ या चित्रपटाचे शूटींग करतोय. तर क्रिती ‘हाऊसफुल4’मध्ये बिझी आहे. दोघांनीही एकमेकांना कामात गढून घेतले आहे.
बुडापेस्ट येथे ‘राबता’च्या शूटींगदरम्यान सुशांत व क्रिती जवळ आले होते. यानंतर एकमेकांच्या ताटात जेवनापासून तर शूटींगनंतर एकमेकांसोबत खासगी क्षण घालवण्यापर्यंत सुशांत व क्रिती परस्परांत गुंतले होते आणि दुसरीकडे सुशांत व अंकिता लोखंडे या दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली होती. सुशांत व अंकिता दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते. पण क्रिती आली आणि सुशांतला अंकिता दुरावली. कदाचित आता कायमची दुरावली.