Kriti Sanan gets a new company, Sushant Singh Rajput | क्रिती सॅननला मिळाली नवी कंपनी, काय करणार आता सुशांत सिंग राजपूत

बॉलिवूड कपल सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सॅननला घेऊन एक मजेदार किस्सा समोर आला आहे. सुशांत आणि क्रितीला नेहमीच एकत्र जिममध्ये घाम गाळताना बघितले आहे. दोघे ही एकमेकांची कंपनी एन्जॉय करताना दिसतात. मात्र क्रितीला जिमसाठी एका नवी कंपनी मिळाली आहे त्यामुळे आता क्रिती सुशांतला इग्नोर करताना दिसू शकते.   

मिड-डेच्या रिपोर्टनुसार ही पार्टनर दुसरी तिसरी कोणी नसून क्रितीची बहीण नुपूर सॅनन आहे. नुपूरला बॉलिवूडमध्ये सिंगर व्हायचे आहे. इंटरनेटवर नुपूरचे काही सारे फॅन फॉलोईंग आहे. मिळालेल्या माहितीनुसार क्रितीप्रमाणे नुपूरलादेखील बॉलिवूडमध्ये नाव कमावयाचे आहे. नुपूरचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्रिती तिला गाईड करते आहे. नुपूरने पॉँडेचरी येथे आदिशक्तीमध्ये अ‍ॅक्टिंगचा कोर्सही केला आहे.
क्रितीच्या चित्रपटांबद्दल सांगायचे झाल्यास ती आशुतोष गोवारीकर यांच्या पानीतमध्ये दिसणार आहे. यासाठी ती घोडेस्वारीचे प्रशिक्षण सुद्धा घेते आहे. तसेच ती दिनेश वजिनच्या आगामी ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटात दिलजीत दोसांझसोबत बघावयास मिळणार आहे. रिपोर्टनुसार, चित्रपटात क्रिती एका पत्रकाराच्या भूमिकेत असून, दिलजीत एका लहान शहरातील तरुणाची भूमिका साकारत आहे. क्रिती तिचा कथित बॉयफ्रेंड सुशांत सिंग सोबत आपल्याला स्क्रिन शेअर करताना दिसू शकते.‘डर्टी डान्सिंग’ या हॉलिवूडपटाचा हिंदी रिमेक तयार करण्यात आला आहे. या डान्सआधारित चित्रपटासाठी प्रोड्यूसरला एका कोरिओग्राफरचा शोध आहे.. कास्ट आणि क्रू फायनल होताच सुशांत व क्रिती यासाठी तयारी सुरू करणार आहेत. या चित्रपटात क्रिती व सुशांत जबदस्त डान्स करताना दिसणार आहे. क्रिती व सुशांत या रिअल लाईफ कपला हा एकत्र असा दुसरा चित्रपट असेल. यापूर्वी ही जोडी ‘राबता’मध्ये दिसली होती. अर्थात हा चित्रपट दणकून आपटला होता.
Web Title: Kriti Sanan gets a new company, Sushant Singh Rajput
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.