A new news about 'Lovebirds' Sushant Singh Rajput and Kriti Sanan! Read exactly !! | ​‘लव्हबर्ड्स’ सुशांत सिंग राजपूत व क्रिती सॅनन यांच्याबद्दल एक नवी बातमी! नक्की वाचा!!

अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि क्रिती सॅनन या दोघांचे रिलेशनशिप आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. गेल्या वर्षभरात या ‘लव्हबर्ड्स’मधील प्रेम चांगलेच बहरले. त्याचमुळे इव्हेंट कुठलाही  असो, हे ‘लव्हबर्ड्स’ दिसतातच दिसतात.  क्रिती व सुशांत दोघांची बॉडी लँग्वेजही बरेच काही सांगून जाते. अर्थात अद्यापही क्रिती व सुशांत आपले रिलेशन मानायला तयार नाहीत, हा भाग वेगळा. कारण आमच्यात ‘तसले’ काहीही नाही, असे क्रिती व सुशांत दोघेही अनेकदा सांगून चुकले आहेत. (बॉलिवूडमध्ये काही अपवाद सोडले तर सगळेच कपल असे सांगतात.) पण खरेच असे असते तर चित्रपटाच्या रिलीजनंतर दोघांच्याही अफेअरच्या चर्चा थांबल्या असत्या. पण त्या अद्यापही सुरु आहेत. ताजी बातमी मानाल तर, या चर्चेला आणखी बळ देणारी खबर आहे.

होय, बी-टाऊनमध्ये सुशांत व क्रितीच्या नात्याची चर्चा बरीच पुढे गेली आहे. अगदी लग्नापर्यंत पुढे. सुशांत व क्रिती दोघेही एकमेकांबद्दल सीरिअस असून दोघांनीही एकमेकांना आपआपल्या पालकांना भेटवले आहे. याच्या पुढची खबर म्हणजे, दोघांनीही लग्न करण्याचा निर्णयही घेतला आहे. अर्थात हे लग्न इतक्यात होणारे नाही. पण लग्नासाठी हे कपल रेडी असल्याचे कळतेय. एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याच्या निर्णयाप्रत हे दोघेही पोहोचल्याचे समजतेय.

ALSO READ : ‘या’ रिमेकमध्ये सुशांत सिंग राजपूत बनणार ‘कॅन्सर सरवाइवर’!!

 बुडापेस्ट येथे ‘राबता’च्या शूटींगदरम्यान सुशांत व क्रिती जवळ आले होते. यानंतर एकमेकांच्या ताटात जेवनापासून तर शूटींगनंतर एकमेकांसोबत खासगी क्षण घालवण्यापर्यंत सुशांत व क्रिती परस्परांत गुंतले होते आणि दुसरीकडे सुशांत व अंकिता लोखंडे या दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली होती. सुशांत व अंकिता दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते. पण क्रिती आली आणि सुशांतला अंकिता दुरावली. कदाचित आता कायमची दुरावली. क्रितीसोबत लग्नाचा विचार हा त्याचा पुरावा म्हणायला हवा.  क्रिती व सुशांतही जोडी रिअल लाईफमध्ये पुढे जाणार असेल तर आनंदच आहे. आम्हाला तर या जोडीला रिअल लाईफमध्ये एकत्र पाहणे आवडेल. तुम्हाला ही पेअर कशी वाटते, ते नक्की सांगा.
Web Title: A new news about 'Lovebirds' Sushant Singh Rajput and Kriti Sanan! Read exactly !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.