सुपर स्टाईलिश! मिलिंद सोमणचे पत्नी अंकितासोबतचे हे स्टाईलिश फोटो तुम्ही पाहिलेत!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 19:05 IST2018-07-08T19:00:23+5:302018-07-08T19:05:14+5:30

 अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कंवर यांचा विवाहसोहळा अनेकार्थाने गाजला होता. नवरा मुलगा ५२ वर्षाचा तर नवरी वय वर्षे २७ची यामुळे या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. 

 Super stylish! Milind Soman and Ankita Konwar’s pose for a new photoshoot | सुपर स्टाईलिश! मिलिंद सोमणचे पत्नी अंकितासोबतचे हे स्टाईलिश फोटो तुम्ही पाहिलेत!!

सुपर स्टाईलिश! मिलिंद सोमणचे पत्नी अंकितासोबतचे हे स्टाईलिश फोटो तुम्ही पाहिलेत!!

 अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कंवर यांचा विवाहसोहळा अनेकार्थाने गाजला होता. नवरा मुलगा ५२ वर्षाचा तर नवरी वय वर्षे २७ची यामुळे या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. वयाच्या फरकाचा विचार न करता मिलिंद व अंकिताने लग्नाचा निर्णय घेतला आणि तो निर्णय तडीसही नेला. याच नव्याने लग्न झालेले लव बर्ड्सचे काही ताजे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे ताजे फोटो आहेत, अंकिता व मिलिंदच्या नव्या फोटोशूटचे. या फोटोशूटबदद्ल इतके आवर्जून सांगायचे कारण म्हणजे, यात मिलिंद व अंकिता हे दोघेही सुपर स्टाईलिश दिसताहेत.

 त्यांचे ड्रेसिंग स्टाईल, त्यांचे अ‍ॅटिट्यूट कुणालाही प्रभावित करेल, असेच आहे. एका ब्रॅण्डसाठीचे हे फोटोशूट नामवंत फॅशन फोटोग्राफर व्हिक्टोरिया कूनदिशिवा हिने शूट केलेले आहे आणि म्हणूनचं ते पाहण्यासारखे आहे. 

तेव्हा तुम्ही पाहा आणि मिलिंद व अंकिता हा नवा अंदाज तुम्हाला कसा वाटला, ते आम्हाला जरूर कळवा.

 मिलिंद आणि  अंकिता दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. आपले प्रेम त्यांनी कधीच लपवून ठेवले नाही. सोशल मीडियावर दोघांनी आपआपल्या प्रेमाची कबुली दिली आणि अखेर हे प्रेम लग्नापर्यंत पोहोचले. 
काही दिवसांपूर्वी मिलिंद व अंकिताचे ब्रेकअप झाल्याची खबर होती. पण मिलिंद व अंकिता दोघांनीही ब्रेकअपची ही बातमी खोटी ठरवत, लग्न केले. अंकिता दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे. २०१३ मध्ये तिने एअर एशियात केबिन क्रू केबिन एग्झिक्यूटिव म्हणून नोकरी सुरु केली होती. तिला आसामीशिवाय हिंदी, इंग्रजी, फ्रेंच आणि बंगाली भाषा येते. नोव्हेंबर २०१५ मध्ये अंकिताने मिलिंदसोबत तिचे पहिले मॅरेथॉन पूर्ण केले होते. 

 

 

 

Web Title:  Super stylish! Milind Soman and Ankita Konwar’s pose for a new photoshoot