भारताच्या टॉप मॉडेल्सपैकी एक असलेला मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेन्ड अंकिता कोनवार अखेर लग्नबंधनात अडकले. अलीबाग येथे दोघांनीही लग्नगाठ बांधली. ५२ वर्षीय मिलिंद आणि २७ वर्षीय अंकिता दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. आपले प्रेम त्यांनी कधीच लपवून ठेवले नाही. सोशल मीडियावर दोघांनी आपआपल्या प्रेमाची कबुली दिली आणि अखेर हे प्रेम लग्नापर्यंत पोहोचले. काही दिवसांपूर्वी मिलिंद व अंकिताचे ब्रेकअप झाल्याची खबर होती. पण मिलिंद व अंकिता दोघांनीही ब्रेकअपची ही बातमी खोटी ठरवत, रविवारी लग्न केले.या लग्नाचे फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. याशिवाय हळद, मेहंदी, संगीत अशा अनेक लग्नविधींचे फोटो व व्हिडिओही आवडीने पाहिले जात आहेत.अंकिता मूळची दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे. मागील दीड वर्षांपासून मिलिंद अंकिताला डेट करत होता.  दोन तीन दिवसांपूर्वी लॉटरीच्या पैशांमुळे अंकिता मिलिंदचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले होते. मात्र त्या निव्वळ अफवा असल्याचे समोर आले असून दोघांनीही लग्नबंधनात अडकत असून आपल्या आयुष्याची नवी सुरूवात करत आहेत. 

मिलिंद सोमणचे हे दुसरे लग्न असून २००६ मध्ये फ्रेंच अभिनेत्री Mylene Jampanoi सोबत लग्न थाटले होते. मात्र लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच दोघांचा घटस्पोट झाला.

गेल्या दीड वर्षांपासून मिलिंद मात्र अंकिताला डेट करत आहे. या नात्याने दोघांचेही कुटुंबीय आनंदी आहेत. अंकिता दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे. २०१३ मध्ये तिने एअर एशियात केबिन क्रू केबिन एग्झिक्यूटिव म्हणून नोकरी सुरु केली होती. तिला आसामीशिवाय हिंदी, इंग्रजी, फ्रेंच आणि बंगाली भाषा येते. नोव्हेंबर २०१५ मध्ये अंकिताने मिलिंदसोबत तिचे पहिले मॅरेथॉन पूर्ण केले होते. मिलिंद प्रत्येक पोस्टमध्ये तिचा उल्लेख श्रीमती असा करतो. काही महिन्यांपूर्वीच मिलिंद अंकिताच्या गुवाहाटी येथील घरी गेला होता. अंकिताच्या भाच्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत तो सहभागी झाला होता.याच निमित्ताने मिलिंद अंकिताच्या पालकांना भेटला आणि अंकिताशी लग्न करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला होता.आधी अंकिताचे पालक वयाच्या अंतरावरून या लग्नासाठी राजी नव्हते.पण मिलिंदला प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्यांनी या लग्नाला होकार दिला होता. 
Web Title: See, photo album of Milind Soman and Ankita Kanwar's wedding, photo from Haldi !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.