Stree trailer: श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या ‘स्त्री’चा ट्रेलर आला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 06:56 IST2018-07-26T20:55:20+5:302018-07-27T06:56:31+5:30
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये राजकुमार राव,श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराणा यांची झलक पाहायला मिळते.

Stree trailer: श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या ‘स्त्री’चा ट्रेलर आला!
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये राज कुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराणा यांची झलक पाहायला मिळते.
ट्रेलरमधील राजकुमार आणि श्रद्धा कपूरची केमिस्ट्री अफलातून आहे. यातील राजकुमारच्या तोंडचे विनोदी संवादही मस्त आहेत आणि यातली अंगावर काटा आणणारी दृश्येही जमून आली आहेत. एकंदर काय तर चित्रपटाचा ट्रेलर उत्सुकता वाढवणारा आहे.
ट्रेलर रिलीज व्हायच्या काही तास आधी राजकुमार रावने ‘स्त्री’चे एक पोस्टर प्रसिद्ध केले होते. यात राजकुमार आणि श्रद्धा असे दोघेही दिसते आहेत. या पोस्टरवर ‘मर्द को दर्द नहीं होता है’ ही टॅगलाईनही दिसते आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धा प्रथमच हॉरर चित्रपटात काम करतेय. यात श्रद्धा कपूर ननच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिचा एकंदर लूक पाहता तिची व्यक्तीरेखा ही हॉलिवूडचा हॉरर सिनेमा कंज्युरिंग वरुन प्रेरित वाटते. अमर कौशिक दिग्दर्शित या चित्रपटात राजकुमार व श्रद्धाची जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर याची कथा कर्नाटकातील ९० च्या दशकात घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. कर्नाटकच्या एका गावात रात्री एका स्त्रीचे भूत फिरायचे. हे भूत रात्री लोकांच्या घराचा दरवाजा ठोठवायची आणि जो कुणी दरवाजा उघडायचा, त्याचा मृत्यू व्हायचा. यानंतर या भूतापासून वाचण्यासाठी लोकांनी आपल्या घराच्या भिंतींवर ‘कल आना’ असे लिहिणे सुरू केले. हा चित्रपट येत्या ३१ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.