सोनाली बेंद्रेच्या घरी पोहोचले स्टार्स! नणंद म्हणाली, सोनाली फाईटर आहे, ती नक्की बरी होईल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 11:49 IST2018-07-05T11:42:50+5:302018-07-05T11:49:53+5:30

तूर्तास सोनालीवर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहे आणि इकडे मुंबईत अनेक बॉलिवूड स्टार्स सोनालीच्या कुटुंबाला हिंमत देत आहेत.

sonali bendre diagnosed cancer bollywood celeb came to support | सोनाली बेंद्रेच्या घरी पोहोचले स्टार्स! नणंद म्हणाली, सोनाली फाईटर आहे, ती नक्की बरी होईल!!

सोनाली बेंद्रेच्या घरी पोहोचले स्टार्स! नणंद म्हणाली, सोनाली फाईटर आहे, ती नक्की बरी होईल!!

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला हायग्रेड कॅन्सर झाल्याचे निदान होताच, संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. इरफान खानच्या आजारपणाच्या बातमीतून बॉलिवूड सावरत नाही, तोच हा दुसरा मोठा धक्का बॉलिवूडला पचवणे जड जातेय. काल खुद्द सोनालीने आपल्या आजाराची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. तूर्तास सोनालीवर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहे आणि इकडे मुंबईत अनेक बॉलिवूड स्टार्स सोनालीच्या कुटुंबाला हिंमत देत आहेत.

सोनालीला कॅन्सर झाल्याचे कळताच, बॉलिवूड स्टार्स अदिती राव हैदरी आणि हुमा कुरेशी बुधवारी रात्री उशीरा सोनालीच्या मुंबईतील घरी पोहोचल्या. 

सोनाली बेंद्रेच्या घरी तिची नणंद सृष्टी आर्या सगळ्यांना सांभाळत आहे. अदिती व हुमा दोघींनीही सृष्टीला भेटून तिला धीर दिला. सोनाली या आजारातून लवकर बरी होऊन परतेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

काल अक्षय कुमारने न्यूयॉर्कमध्ये सोनालीची भेट घेतली. सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड स्टार्सनी सोनाली लवकर बरे होण्याची कामना केली.

सृष्टीनेही सोनाली फाईटर असल्याचे सांगत, ती या आजारावर नक्की मात करेल, असे सांगितले. आम्हाला सोनालीच्या आजाराबद्दल अचानक कळले. कदाचित अशा गोष्टी अचानक समोर येतात. पण सोनाली लढाऊ बाण्याची आहे. ती प्रचंड सकारात्मक आहे. ती यातून बाहेर पडेल. मी लवकरच सोनालीला भेटायला न्यूयॉर्कला जातेय. सोनाली आम्हा सर्वांच्या खूप जवळ आहे. ती तिचे हेल्थ बुलेटिन चाहत्यांसोबत वेळोवेळी शेअर करेल. तूर्तास लोकांचे प्रेम आणि त्यांच्या शुभेच्छांसाठी आम्ही आभारी आहोत, असे सृष्टी म्हणाली.

 

Web Title: sonali bendre diagnosed cancer bollywood celeb came to support