'फोटोग्राफ'मधील भूमिकेसाठी सान्या घेतेय ही खास ट्रेनिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 06:00 AM2019-02-10T06:00:00+5:302019-02-10T06:00:00+5:30

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्रा 'फोटोग्राफ' सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नवाज आणि सान्या पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करतायेत. 

sanya malhotra learning gujarati language for photographer movie | 'फोटोग्राफ'मधील भूमिकेसाठी सान्या घेतेय ही खास ट्रेनिंग

'फोटोग्राफ'मधील भूमिकेसाठी सान्या घेतेय ही खास ट्रेनिंग

googlenewsNext
ठळक मुद्देरितेश बत्रा यांचा हा सिनेमा धारावीमधल्या एका फोटोग्राफरवर आधारित आहेया सिनेमात सान्या मल्होत्रा एका गुजराती मुलीची भूमिका साकारते आहे

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्रा 'फोटोग्राफ' सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नवाज आणि सान्या पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करतायेत. 


रितेश बत्रा यांचा हा सिनेमा धारावीमधल्या एका फोटोग्राफरवर आधारित आहे. या सिनेमात सान्या मल्होत्रा एका गुजराती मुलीची भूमिका साकारते आहे. सान्या दिल्लीत लहानाची मोठी झाली आहे. त्यामुळे गुजराती मुलीची भूमिका साकारण्यासाठी ती  भाषेवर विशेष मेहनत घेतेय. सान्याला ही भूमिका साकार करण्यात कोणतीच कसर सोडायची नाही आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखती सांगितले होते की, ''फोटोग्राफ'मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. कारण नवाजुद्‌दीन हा माझा आवडता अभिनेता असल्याने त्याच्यासोबत काम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण होत आहे.'' 


8 मार्च नवाज आणि सान्याच्या जोडीचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  तसेच ती लवकरच महान गणितज्ञ शकुंतला देवी यांचा बायोपिकमध्ये सुद्धा दिसणार आहे. या सिनेमात सान्या नक्की कोणती भूमिसा साकारणार हे गुलदस्त्यात आहे. मात्र सूत्रांचे मानाल तर शकुंतला  देवींच्या मुलीची भूमिका ती साकारणार आहे. तर विद्या बालन  शकुंतला देवीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अनु मेनन करणार आहे. यावर्षी जून-जुलैमध्ये या बायोपिकचे शूटींग सुरु होणे अपेक्षित आहे.

Web Title: sanya malhotra learning gujarati language for photographer movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.