सलमान खान आणि संजय लीला भन्साळी येणार 'या' चित्रपटासाठी एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 03:42 PM2018-06-30T15:42:38+5:302018-06-30T22:00:00+5:30

 याआधी सलमान आणि संजय लीला भन्साळी यांनी 2007 मध्ये आलेल्या सावरिया चित्रपटात एकत्र काम केले होते.

Salman Khan and Sanjay Leela Bhansali will come together for this film | सलमान खान आणि संजय लीला भन्साळी येणार 'या' चित्रपटासाठी एकत्र

सलमान खान आणि संजय लीला भन्साळी येणार 'या' चित्रपटासाठी एकत्र

googlenewsNext
ठळक मुद्देभन्साळी आणि सलमान यांच्या नव्या प्रोजेक्टचे नाव इंशाल्लाह असे होऊ शकते

दबंग खान आणि संजय लीला भन्साळी तब्बल 11 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार लवकरच हे दोघे आगामी प्रोजेक्टवर काम सुरु करणार आहेत. भन्साळी आणि सलमान यांच्या नव्या प्रोजेक्टचे नाव इंशाल्लाह असे होऊ शकते. गेल्या आठवड्यातचे चित्रपटाचे टायटल रजिस्टर करण्यात आले आहे. भन्साळी यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर नजर टाकली तर चित्रपटाचे फायनल ड्राफ्ट आणि स्क्रिप्ट पूर्ण करण्यासाठी अजून सहा ते नऊ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. चित्रपटाची शूटिंग पुढच्या वर्षी सुरु होण्याची शक्यता आहे.

ALSO  READ :  WHAT?? आम्हाला ‘दबंग3’ नको! सोशल मीडियावर छेडली मोहिम!!

 याआधी सलमान आणि संजय लीला भन्साळी यांनी 2007 मध्ये आलेल्या सावरिया चित्रपटात एकत्र काम केले होते. आता या नव्या प्रोजेक्टची सुरुवात 2019च्या मध्यापर्यंत सुरु होण्याची अशा आहे. सध्या सलमान त्याचा आगामी चित्रपट भारतच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.  भारतमध्ये सलमान खान 5 वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. चित्रपटात सलमान 60 वर्षांचे आयुष्य जगताना दाखवण्यात येणार आहे. 52 वर्षांचा सलमान खान 'भारत'मध्ये 18 वर्षांचा दिसणार आहे. यासाठी खास ऐज रिडक्शन टेक्निक  वापरली जाणार आहे. म्हणजेच, ‘मैने प्यार किया’मध्ये जो सलमान आपण पाहिलात, अगदी तसा सलमान ‘भारत’मध्ये आपल्याला दिसणार आहे. या टेक्निकसंदर्भात मेकर्सनी व्हिएफएक्स टीमसोबत चर्चा केली. याच टीमने ‘फॅन’ या चित्रपटात शाहरूखसाठी काम केले होते. सलमानला वजनही कमी करावे लागणार आहे. यात त्याच्या बहिणीची भूमिका दिशा पटानी साकारणार आहे तर सलमानच्या अपोझिट प्रियांका चोप्राला साईन करण्यात आले आहे. टी-सीरिज या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. 2019च्या ईदला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Salman Khan and Sanjay Leela Bhansali will come together for this film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.