ह्या कारणामुळे ऐश्वर्या राय देऊ शकते भन्साळीच्या चित्रपटात काम करण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 17:37 IST2018-08-29T17:33:18+5:302018-08-29T17:37:22+5:30
ऐश्वर्या आणि अभिषेक जवळपास १० वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे ऐश्वर्याला पतीसोबत काम करण्याची संधी गमवायची नाही. म्हणूनच ती भन्साळींच्या चित्रपटाला नकार देऊ शकते असे बोलले जात आहे.

ह्या कारणामुळे ऐश्वर्या राय देऊ शकते भन्साळीच्या चित्रपटात काम करण्यास नकार
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा काही दिवसांपूर्वी 'फन्ने खान' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात ती पॉप सिंगर बेबी सिंगची भूमिका केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला आणि हा चित्रपट जास्त काळ चर्चेचा विषय बनला नाही. आता ऐश्वर्या राय चर्चेत आली आहे ती आगामी चित्रपट 'गुलाब जामुन'मुळे. या चित्रपटातून ती पुन्हा एकदा अभिषेक बच्चनसोबत रोमांस करताना दिसणार आहे. आता सूत्रांकडून माहिती मिळते आहे की या चित्रपटासाठी ऐश्वर्याने संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे.
ऐश्वर्याला संजय भन्साळींच्या चित्रपटात काम करण्याची नामी संधी चालून आली होती. संजय लीला भन्साळींच्या 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास' या चित्रपटात ऐश्वर्याने काम केले आहे. हे दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. ऐश्वर्यासोबत 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' हा चित्रपट करण्याची इच्छाही भन्साळींना होती. मात्र हा योग काही जुळून आला नाही. अखेर बऱ्याच वर्षांनी ऐश्वर्या आणि भन्साळी एकत्र काम करणार होते. ऐश्वर्याही या चित्रपटासाठी उत्सुक होती मात्र पती अभिषेकमुळे कदाचित हातची संधी तिला गमवावी लागणार आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक ही जोडी अनुराग कश्यपच्या 'गुलाबजामून' या चित्रपटात दिसणार आहे. मात्र भन्साळींचा चित्रपट आणि 'गुलाबजामून'च्या चित्रीकरणाच्या तारखा एकच असल्यामुळे ऐश्वर्या संभ्रमात पडली आहे.
ऐश्वर्या आणि अभिषेक जवळपास १० वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे ऐश्वर्याला पतीसोबत काम करण्याची संधी गमवायची नाही. म्हणूनच ती भन्साळींच्या चित्रपटाला नकार देऊ शकते असे बोलले जात आहे. आता ऐश्वर्या काय निर्णय घेते, हे पाहणे कमालीचे ठरेल.