दीपिका पादुकोण-रणवीर सिंगचे लग्न लांबणीवर? आता नववर्षाचे मुहूर्त??

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 09:12 PM2018-09-20T21:12:17+5:302018-09-20T21:12:47+5:30

दीपिका व रणवीर येत्या नोव्हेंबरमध्ये लग्न करणार, असा दावा अनेक मीडियाच्या बातम्यांमधून करण्यात आला होता. पण आता एक वेगळीच बातमी आहे.

ranveer singh and deepika padukone have postponed their wedding date | दीपिका पादुकोण-रणवीर सिंगचे लग्न लांबणीवर? आता नववर्षाचे मुहूर्त??

दीपिका पादुकोण-रणवीर सिंगचे लग्न लांबणीवर? आता नववर्षाचे मुहूर्त??

googlenewsNext

गेल्या अनेक दिवसांपासून दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या बातम्या चर्चेत आहेत. दीपिका व रणवीर येत्या नोव्हेंबरमध्ये लग्न करणार, अशी बातमी होती. दीपिकाने आपल्या लग्नामुळेचं ‘पद्मावत’नंतर कुठलाही चित्रपट साईन केलेला नाही, अशीही खबर होती. केवळ इतकेच नाही लग्नाची खरेदीही सुरू झाल्याचा दावा अनेक मीडियाच्या बातम्यांमधून करण्यात आला होता. पण आता एक वेगळीच बातमी आहे. होय, रिपब्लिक टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिका व रणवीरने लग्नाची तारीख लांबणीवर टाकलीय. या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, नोव्हेंबरऐवजी पुढीलवर्षी म्हणजे २०१९ च्या सुरूवातीला लग्न करण्याचा निर्णय दीपिका व रणवीरने घेतला आहे. अर्थात यामागचे कारण मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही. रिपब्लिक टीव्हीची ही बातमी खरी असेल तर साहजिकच दीपिका व रणवीरच्या चाहत्यांची निराशा होणार आहे.
रणवीर व दीपिका संजय लीला भन्साळींच्या ‘रामलीला’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. तेव्हापासून या कपलच्या लव्हलाईफची चर्चा आहे. अद्याप दीपिका व रणवीर दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे त्यांच्यातील नाते मान्य केलेले नाही. पण सार्वजनिक ठिकाणी अप्रत्यक्षपणे ते मान्य करण्यात त्यांनी कुठलीही कसूर ठेवलेली नाही.
दोघांच्याही कामाबद्दल बोलायचे तर रणवीर सध्या ‘सिम्बा’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ‘गली ब्वॉय’ आणि १९९३ व्या क्रिकेट वर्ल्ड कप विजयावर आधारित ‘८३’ या चित्रपटातही तो बिझी आहे. इतकेच नाही तर करण जोहरच्या ‘तख्त’ या मल्टीस्टारर चित्रपटातही त्याची वर्णी लागली आहे. दीपिकाचे म्हणाल तर ‘पद्मावत’नंतर तिने कुठलाही सिनेमा साईन केलेला नाही.

Web Title: ranveer singh and deepika padukone have postponed their wedding date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.