‘अरेंज मॅरेज’ करणार राजकुमार रावची गर्लफ्रेन्ड पत्रलेखा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 18:33 IST2018-09-09T18:30:28+5:302018-09-09T18:33:51+5:30
राजकुमार आणि पत्रलेखाचे नाते बॉलिवूडमध्ये आदर्श म्हणून ओळखले जाते. या कपलने आपले नाते कधीच कुणापासून लपवले नाही.

‘अरेंज मॅरेज’ करणार राजकुमार रावची गर्लफ्रेन्ड पत्रलेखा!
‘न्यूटन’, ‘बरेली की बर्फी’, ‘शादी में जरूर आना’ अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांची मने जिंकणारा राजकुमार राव सध्या यशाच्या शिखरावर आहे. राजकुमार राव प्रेमात आहे, हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. अभिनेत्री अन्तिवा पॉलसोबत (स्क्रीन नेम पत्रलेखा) दीर्घकाळापासून तो रिलेशनशिपमध्ये आहे. राजकुमार आणि पत्रलेखाचे नाते बॉलिवूडमध्ये आदर्श म्हणून ओळखले जाते. या कपलने आपले नाते कधीच कुणापासून लपवले नाही. सोशल मीडियावर दोघेही आपले फोटो सर्रास शेअर करतात. दोघांनीही अद्याप लग्न केलेले नाही. शिवाय आजपर्यंत दोघेही कधीही लग्नाबद्दल बोललेले नाही़. पण आता राजकुमारची गर्लफ्रेन्ड पत्रलेखा ‘अरेंज मॅरेज’ करणार आहे.
आता पत्रलेखा लग्न करणार, असेचं तुम्हाला वाटेल. पण थांबा, पत्रलेखा ‘अरेंज मॅरेज’ हे खरे आहे. पण खरोखर नाही तर रिल लाईफमध्ये. होय, पत्रलेखाच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘अरेंज मॅरेज’ आहे. दिग्दर्शक प्रदीप सरकार ‘हेलिकॉप्टर ईला’नंतर नवा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे शीर्षक आहे, ‘अरेंज मॅरेज’. यात पत्रलेखाची वर्णी लागली आहे. लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरू होईल. तूर्तास पत्रलेखा जाम आनंदात आहे. तिने स्वत:चं याचा खुलासा केला. दादांच्या (प्रदीप सरकार) आॅफिसमधून कॉल आला होता. त्यांनी माझे काम पाहिले की नाही, मला ठाऊक नाही. पण मी त्यांची खूप मोठी चाहती आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली आणि मी इतके खूश झाले की, मी लगेच होकार दिला, असे तिने सांगितले.
राजकुमार राव हा पत्रलेखा हिच्यासोबत बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. पत्रलेखाने हंसल मेहता यांच्या ‘सिटीलाईट्स’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. राजकुमार राव व पत्रलेखाची पहिली भेट एफटीआयआयमध्ये झाली होती. एका शॉर्टफिल्म्सच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरले.