'लवरात्रि' सिनेमातील 'ढोलिडा' हे नवीन गाणे झाले प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 06:15 PM2018-09-24T18:15:16+5:302018-09-24T18:18:22+5:30

सलमान खानने त्याची बहीण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्मा याचा आगामी चित्रपट 'लवरात्रि'मधील आणखीन एक गाणे प्रदर्शित केले आहे.

The new song 'Daolida' of 'Loveyatri' movie launched | 'लवरात्रि' सिनेमातील 'ढोलिडा' हे नवीन गाणे झाले प्रदर्शित

'लवरात्रि' सिनेमातील 'ढोलिडा' हे नवीन गाणे झाले प्रदर्शित

googlenewsNext
ठळक मुद्देआयुष शर्माचे 'लवयात्री' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण 'ढोलिडा' या गाण्यात आयुष शर्मा व वरीना हुसैनचा गरबा


अभिनेता सलमान खानची बहिण अर्पिता खानचा नवरा आयुष शर्मा 'लवयात्री' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्या पदार्पणासाठी कोणतीही कसर सलमानला ठेवायची नाही आहे. त्यामुळे सलमानने त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. आता सलमानने 'लवयात्री' सिनेमातील 'ढोलिडा' हे गाणे रिलीज केले आहे. त्याने सोशल मीडियावर गाणे प्रदर्शित करून लिहिले की, 'ऐका 'लवयात्री'चे नवीन गाणे 'ढोलिडा''.


'ढोलिडा' गाण्यावर आयुष शर्मा व वरीना हुसैन जोशात गरबा खेळताना दिसत आहेत. नवरात्री उत्सवात हे गाणे धमाल करणार आहे. या गाण्यात राम कपूरदेखील दिसत आहे. या गाण्याला उदित नारायण, नेहा कक्कर, पलक मुच्छल व राजा हसन या चार गायकांनी स्वरसाज दिला आहे. हे गाणे संगीतबद्ध तनिष्क बागची यांनी केले आहे. 



या सिनेमातील गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चोगदा हे गाणे सुपरहिट ठरले आहे. काही कालावधीत हे गाणे ५५ मिलियन लोकांनी पाहिले आहे. 
सलमान खान प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन अभिराज मीनावालाने केले आहे. गुजरातच्या पार्श्वभूमीवर साकारलेला लवयात्री एक रोमॅन्टिक चित्रपट आहे. वरीना हुसैन  अभिनेत्री या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतेय. वरिना गुजरातेत येते आणि येथे तिची भेट आयुषसोबत होते. मग दोघांची मैत्री आणि पुढे प्रेम. पण यासाठी दोघांनीही ब-्याच अग्नी दिव्यातून जावे लागते, अशी याची ढोबळ कथा आहे. आयुषयात गरबा टीचरची भूमिका साकारणार आहे.लवरात्रि हा सिनेमा ५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

Web Title: The new song 'Daolida' of 'Loveyatri' movie launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.