आता दुस-या मुलाला लॉन्च करणार सनी देओल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 19:25 IST2018-08-26T19:21:57+5:302018-08-26T19:25:34+5:30

सनी देओल लवकरच प्रेक्षकांसाठी ‘यमला पगला दीवाना फिर से’ हा चित्रपट घेऊन येतोय. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ‘सनी पाजी’ व्यस्त आहे. पण याचदरम्यान सनीने एक वेगळी तयारी सुरू केली आहे. 

I will launch both my sons Karan and Rajveer: Sunny Deol | आता दुस-या मुलाला लॉन्च करणार सनी देओल!

आता दुस-या मुलाला लॉन्च करणार सनी देओल!

सनी देओल लवकरच प्रेक्षकांसाठी ‘यमला पगला दीवाना फिर से’ हा चित्रपट घेऊन येतोय. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ‘सनी पाजी’ व्यस्त आहे. पण याचदरम्यान सनीने एक वेगळी तयारी सुरू केली आहे. होय, सनी लवकरच त्याचा लहान मुलगा राजवीर देओल यालाही बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहे.
सनीचा मोठा मुलगा करण लवकरच ‘पल पल दिल के पास’द्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. यानंतर सनीचा लहान मुलगा राजवीरही रूपेरी पडद्यावर दिसणार. पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द सनीने याचा खुलासा केला. ‘माझ्या पहिल्या मुलाचा चित्रपट पूर्ण केल्यानंतर मी माझ्या लहान मुलाचा चित्रपट सुरू करणार. पण त्याहीपूर्वी एक अ‍ॅक्टिंग प्रोजेक्ट हातावेगळा करणार,’ असे सनीने सांगितले.
‘पल पल दिल के पास’हा चित्रपट एक रोमॅण्टिक ड्रामा असून, सनी देओल स्वत:च चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे. या अगोदर सनीने दिल्लगी आणि घायल रिर्टन्स या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सनीच्या या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली होती. त्यामुळे करण देओलच्या चित्रपटालाही असाच काहीसा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून देओल परिवाराची तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहे.
सनी देओलच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सांगायचे तर सनी, बॉबी आणि धर्मेन्द्र या पिता-पुत्रांचा ‘यमला पगला दीवाना फिर से’ येत्या ३१ आॅगस्टला रिलीज होतोय. यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला सनीचा ‘भैय्याजी सुपरहिट’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या दोन चित्रटानंतर सनी देओल राजकुमार संतोषींच्या चित्रपटात दिसणार अशी चर्चा आहे. राजकुमार यांच्यासोबत सनीने ‘घातक’मध्ये काम केले आहे.
 

Web Title: I will launch both my sons Karan and Rajveer: Sunny Deol