‘धडक’ जोडीचे पहिले फोटोशूट! पाहा, जान्हवी कपूर व ईशान खट्टरचा नवा अंदाज!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 19:47 IST2018-07-03T19:37:44+5:302018-07-03T19:47:20+5:30
‘धडक’च्या ट्रेलरला बॉलिवूड प्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. आता वेळ आहे ती, ‘धडक’च्या या नव्या कोऱ्या जोडप्याच्या फोटाशूटची.

‘धडक’ जोडीचे पहिले फोटोशूट! पाहा, जान्हवी कपूर व ईशान खट्टरचा नवा अंदाज!!
श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर लवकरच ‘धडक’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतेय. या चित्रपटात तिच्यासोबत आहे तो शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर. जान्हवी व ईशानची जोडी चाहत्यांच्या चांगलीच पसंतीत उतरली आहे. ‘धडक’च्या ट्रेलरवरून त्याचा अंदाज येतो. या ट्रेलरला बॉलिवूड प्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. आता वेळ आहे ती, ‘धडक’च्या या नव्या कोऱ्या जोडप्याच्या फोटाशूटची.
होय, जान्हवी व ईशानने अलीकडे एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले. या फोटोशूटचे फोटो बघून तुम्ही पुन्हा एकदा जान्हवी व ईशानच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत.
यात ‘धडक’ची जोडी कमालीची सुंदर दिसतेय. जान्हवी व ईशानचे हे एकत्र असे पहिले फोटोशूट आहे. या फोटोशूटचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ते पाहा आणि कसे वाटते, ते सांगायला विसरू नका.
तूर्तास जान्हवी आणि ईशान हे दोघेही ‘धडक’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. धडक’ हा ‘सैराट’ या ब्लॉकबस्टर मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे, हे आपण जाणतोच. ‘झिंग झिंग झिंगाट’च्या तालावर या ‘सैराट’ने सिने रसिकांना अक्षरशा: याड लावलं. या सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या. त्यामुळे तिकीट खिडकीवरही ‘सैराट’ने सगळे रेकॉर्ड मोडले. पण निश्चितपणे ‘सैराट’पेक्षा ‘धडक’चा बाज वेगळा आहे.
‘धडक’ चित्रपट राजस्थानी पार्श्वभूमीवर आधारित आहे. यात जान्हवी व ईशान खट्टर दोघेही राजस्थानी टोनमध्ये बोलताना दिसताहेत.
ट्रेलरमधील जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर यांची केमिस्ट्रीही अफलातून आहे. चित्रपटातील अनेक सीन्स ‘सैराट’ची आठवण करून देतात, पण जान्हवी आणि ईशान या नव्या-को-या जोडीला पाहणे, एक नवा अनुभव आहे.