Deepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या मेहेंदी सेरेमनीचे फोटो तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 04:29 PM2018-11-20T16:29:04+5:302018-11-20T19:20:52+5:30

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने मेहेंदी कार्यक्रमाचे फोटो दीपिका आणि रणवीरने त्यांच्या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले आहेत. या फोटोत दोघांच्या हातावर मेहेंदी आपल्याला पाहायला मिळत आहे.

Deepika Ranveer Wedding: Deepika Padukone, Ranveer Singh mehendi photos are OUT | Deepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या मेहेंदी सेरेमनीचे फोटो तुम्ही पाहिले का?

Deepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या मेहेंदी सेरेमनीचे फोटो तुम्ही पाहिले का?

googlenewsNext
ठळक मुद्देदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने शेअर केलेल्या फोटोत रणवीर, दीपिका नाचताना देखील दिसत आहे. रणवीर आणि दीपिका दोघेही या फोटोत खूपच खूश दिसत असून ते दोघे मेड फॉर इच अदर आहेत असे त्यांचे चाहते त्यांना कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी नुकतेच इटलीत लग्न केले. इटलीतील लेक कोमो परिसरात कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर ते भारतात परतले असून ते सध्या त्यांच्या रिसेप्शनसाठी बंगलूरूमध्ये दाखल झाले आहेत. रणवीर आणि दीपिका या दोघांनाही प्रचंड फॅनफॉलॉव्हिंग असल्याने त्यांच्या लग्नाची त्यांचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात होते.

रणवीर आणि दीपिकाने केवळ त्यांच्या जवळच्या नातलगांच्या आणि मित्रमैत्रिणीच्या उपस्थितीत इटलीला लग्न केलं. हे लग्न अतिशय थाटामाटात झाले. तसेच या लग्नाला प्रचंड सुरक्षा देखील ठेवण्यात आली होती. लग्नातील कोणत्याही पाहुण्याला लग्न विधी अथवा लग्न परिसरातील कोणताही फोटो अथवा व्हिडिओ काढण्याची परवानगी नव्हती. सिंधी पद्धतीने लग्न झाल्यानंतर त्याच दिवशी दीपिका आणि रणवीने त्यांच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या लग्नाचे काही फोटो पोस्ट केले.

 

 

या फोटोला लाखोहून अधिक लाइक्स काहीच मिनिटांत मिळाले होते आणि आता त्यांच्या मेहेंदी कार्यक्रमाचे फोटो दीपिका आणि रणवीरने त्यांच्या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले आहेत.

 

 

या फोटोत दोघांच्या हातावर मेहेंदी आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच एका फोटोत रणवीर, दीपिका नाचताना देखील दिसत आहे.

 

रणवीर आणि दीपिका दोघेही या फोटोत खूपच खूश दिसत असून ते दोघे मेड फॉर इच अदर आहेत असे त्यांचे चाहते त्यांना कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 

दीपिका आणि रणवीरचा संगीत समारंभ, मेहेंदी समांरभ इटलीमध्येच झाला. संगीत समारंभासाठी गायिका हर्षदीप कौरला आमंत्रित करण्यात आले होते. हर्षदीपने एकाहून एक दमदार गाणी सादर करत या समारंभात चार चाँद लावले.  दीपवीरने संगीत सोहळ्यात धम्माल मस्ती केली.

रणवीर यावेळी फुल मूडमध्ये होता. त्याने दीपिकासाठी ‘गुंडे’मधील ‘तुने मारी एंट्री’ गायले. संगीत समारोहात सगळेच भारतीय पोशाखात होते. ‘मेहंदी है रचने वाली’, ‘काला शा काला’च्या स्वरांची धूम होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही सेरेमनीत रणवीरने प्रचंड एन्जॉय केले. मुंबईत २८ नोव्हेंबर २०१८ ला बॉलिवूडमधील मित्रमैत्रिणींसाठी ते रिसेप्शन देणार आहेत. 

लग्नविधीत खेळले जाणारे खेळ देखील दीपिका आणि रणवीर खेळत असताना या फोटोत दिसून येत आहे. 

 

 

 

Web Title: Deepika Ranveer Wedding: Deepika Padukone, Ranveer Singh mehendi photos are OUT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.