लग्नानंतर दीपवीरने विकत घेतले इतक्या कोटींचे घर, लवकरच करणार गृहप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 06:18 PM2018-11-19T18:18:21+5:302018-11-19T18:27:02+5:30

लग्नानंतर दीपवीर भारतात तीन रिसेप्शन देणार आहेत.

Deepika Padukone And Ranveer Singh Have Bought A New House In Mumbai | लग्नानंतर दीपवीरने विकत घेतले इतक्या कोटींचे घर, लवकरच करणार गृहप्रवेश

लग्नानंतर दीपवीरने विकत घेतले इतक्या कोटींचे घर, लवकरच करणार गृहप्रवेश

googlenewsNext
ठळक मुद्देलवकरच दीपवीर होणार नव्या घरात शिफ्टदीपवीरने जुहू परिसरात घेतला आलिशान बंगला

बॉलिवूडमधील सर्वांची लाडकी जोडी म्हणजे अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पादुकोण नुकतेच लग्नबेडीत अडकले आहेत. त्या दोघांचा विवाह सोहळा इटलीतील लेक कोमोमध्ये १४ नोव्हेंबर व १५ नोव्हेंबरला पार पडला आणि आता ते भारतात परतले आहेत. जवळच्या मित्र मैत्रिणींसाठी भारतात रिसेप्शन ठेवले आहे. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर त्या दोघांनी नवीन घर विकत घेतले असून लवकरच ते त्या घरात शिफ्ट होणार आहेत.


सध्या दीपिका रणवीरच्या मुंबईतील घरी राहत आहे. मात्र त्या दोघांनीही मुंबईतील जुहू परिसरात आलिशान बंगला विकत घेतले आहे. या बंगल्याची किंमत जवळपास ५० कोटी असल्याचे बोलले जात आहे. त्या दोघांनाही त्यांच्या मनाप्रमाणे घर सजवायचे असल्यामुळे सध्या या बंगल्याच्या इंटेरियरचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखीन थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे ते दोघे रणवीरच्या श्री बंगल्यात राहत आहेत. त्यांच्या या नव्या घराबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूपच उत्सुक आहेत. 

लग्नानंतर दीपवीर भारतात तीन रिसेप्शन देणार आहेत. होय, येत्या २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे दीपवीरच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन होईल. दीपिकाचे आई-वडिल हे रिसेप्शन होस्ट करतील. यानंतर येत्या २८ नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला मुंबईच्या ग्रण्ड हयात हॉटेलमध्ये दुसरे व तिसरे रिसेप्शन होणार आहे. २८ तारखेच्या रिसेप्शला केवळ मित्र आणि कुटुंबीय असतील. तर १ डिसेंबरचे रिसेप्शन केवळ बॉलिवूडमधील मित्रपरिवारासाठी असणार आहे.
 

Web Title: Deepika Padukone And Ranveer Singh Have Bought A New House In Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.