या दिग्दर्शकाच्या चित्रपटातून होणार रणबीर कपूर-दीपिका पादुकोणचे ‘कमबॅक’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 01:51 PM2019-04-26T13:51:16+5:302019-04-26T13:52:19+5:30

बॉलिवूडच्या आयकॉनिक जोड््यांची यादी बनलीच तर या यादीत एका जोडीचे नाव हमखास असेल. ती म्हणजे, रणबीर कपूर आणि दीपिका ...

deepika padukone and ranbir kapoor may be seen together once again in anurag basu film | या दिग्दर्शकाच्या चित्रपटातून होणार रणबीर कपूर-दीपिका पादुकोणचे ‘कमबॅक’!!

या दिग्दर्शकाच्या चित्रपटातून होणार रणबीर कपूर-दीपिका पादुकोणचे ‘कमबॅक’!!

googlenewsNext
ठळक मुद्दे रणबीर सध्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात बिझी आहे. तर दीपिका पादुकोण ‘छपाक’ या चित्रपटाचे शूटींग करतेय.

बॉलिवूडच्या आयकॉनिक जोड््यांची यादी बनलीच तर या यादीत एका जोडीचे नाव हमखास असेल. ती म्हणजे, रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण. रिअल लाईफमध्ये रोमॅन्टिक रिलेशन शेअर करणारी ही जोडी तुटली. पण रिल लाईफमधली त्यांची केमिस्ट्री मात्र अतूट आहे. ‘ये जवानी है दीवानी’ आणि ‘तमाशा’ या चित्रपटातील त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली. आजही या जोडीची क्रेजतसूभरही कमी झालेली नाही आणि हेच कारण आहे की, आजही या जोडीला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी निर्माते-दिग्दर्शक उत्सुक आहेत. तूर्तास दिग्दर्शक अनुराग बासू यांनी बाजी मारलीय. होय, सगळे काही जमून आले तर अनुरागच्या आगामी चित्रपटात रणबीर व दीपिकाची ऑनस्क्रीन जादू पुन्हा एकदा पाहता येईल.

रणबीरने अनुरागसोबत ‘बर्फी’ आणि ‘जग्गा जासूस’ सारखे चित्रपट केले आहेत. दीपिकाने मात्र अनुरागसोबत अद्याप एकही चित्रपट केलेला नाही. त्यामुळे तिने या चित्रपटासाठी होकार दिलाच तर रणबीर-दीपिका-अनुराग या तिगडीचा हा पहिला चित्रपट असेल.


रणबीर व दीपिका कधीकाळी खऱ्या आयुष्यात रिलेशनशिपमध्ये होते. पण कालांतराने त्यांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअपनंतरही इम्तियाज अलीच्या ‘तमाशा’ चित्रपटासाठी ही जोडी सगळे मतभेद विसरून एकत्र आली. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री इतकी लाजवाब होती की, या जोडीने प्रेक्षकांना भूरळ पाडली. आता अनुराग दादाच्या चित्रपटात ही जोडी काय कमाल करते ते बघूच.
रणबीर सध्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात बिझी आहे. तर दीपिका पादुकोण ‘छपाक’ या चित्रपटाचे शूटींग करतेय. तिचा हा चित्रपट अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर बेतलेला आहे.

Web Title: deepika padukone and ranbir kapoor may be seen together once again in anurag basu film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.