गर्लफ्रेंडला घेऊन मलाइका अरोराला भेटायला पोहोचला अरबाज खान, एकत्र केले लंच!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 17:17 IST2018-04-24T11:44:36+5:302018-04-24T17:17:04+5:30
सुपरस्टार सलमान खानचा भाऊ अभिनेता अरबाज खान याने गेल्यावर्षी पत्नी मलाइका अरोराशी घटस्फोट घेतला. दोघे विभक्त झाल्यानंतरही त्यांच्यातील मैत्री ...

गर्लफ्रेंडला घेऊन मलाइका अरोराला भेटायला पोहोचला अरबाज खान, एकत्र केले लंच!!
स परस्टार सलमान खानचा भाऊ अभिनेता अरबाज खान याने गेल्यावर्षी पत्नी मलाइका अरोराशी घटस्फोट घेतला. दोघे विभक्त झाल्यानंतरही त्यांच्यातील मैत्री वेळोवेळी दिसून आली. फॅमिली फंक्शनमध्ये या दोघांना बºयाचदा बघण्यात आले. दरम्यान, आता अशी अफवा आहे की, अरबाज सध्या येलो मेहराला डेट करीत आहे. सोशल मीडियावर अरबाज आणि मेहराचे फोटोही व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये त्याची पूर्व पत्नी मलाइका अरोरा, तिचे आई-वडील आणि बहीण अमृता अरोरा हेदेखील बघावयास मिळत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरबाज खान आणि मलाइका आपल्या फॅमिलीसोबत लंच डेटला गेले होते. जेव्हा हे सर्व सेलिब्रिटी रेस्टॉरंटबाहेर येत होते, तेव्हा त्यांची छबी माध्यमांच्या कॅमेºयात कैद झाली.
![]()
![]()
![]()
फोटोमध्ये अरबाज पिंक कलरचा टी-शर्ट आणि ब्लॅक ट्रॅक पँटमध्ये दिसत आहे, तर येलो मेहराने पिवळ्या रंगाचा टॉप आणि पांढºया रंगाची पँट घातल्याचे दिसत आहे. मलाइका आरोराची बहीण अमृता अरोरा ब्लू रंगाची जीन्स आणि व्हाइट लॉन्ग शर्टमध्ये बघावयास मिळाली. मलाइका आणि अरबाजला अरहान नावाचा एक मुलगा आहे.
![]()
![]()
![]()
दरम्यान, अरबाज खान सध्या त्याच्या आगामी ‘दबंग-३’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात सुपरस्टार सलमान खान प्रमुख भूमिकेत बघावयास मिळणार आहे. मात्र चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीचे नाव अद्यापपर्यंत निश्चित झाले नाही. चित्रपटात टीव्ही अभिनेत्री मौनी राय गेस्ट अपीयरंज देताना बघावयास मिळू शकते. काही काळापूर्वीच अशी बातमी समोर आली होती की, मौनीची भूमिका सोनाक्षी सिन्हाच्या ‘रज्जो’ या पात्रापेक्षाही महत्त्वपूर्ण राहणार आहे. परंतु नंतर हे स्पष्ट झाले की, मौनीची भूमिका फार मोठी नसणार आहे. ती एका ‘फ्लॅशबॅक दृश्यात बघावयास मिळणार आहे, तर सोनाक्षी चित्रपटात बघावयास मिळणार की नाही याविषयी अजूनही सस्पेंस कायम आहे.