अनुराग कश्यपला तयार करायचा आहे या वादग्रस्त व्यक्तीच्या आयुष्यावर चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 15:59 IST2018-02-23T10:29:07+5:302018-02-23T15:59:07+5:30
दिग्दर्शक अनुराग कश्यप त्याच्या आगामी चित्रपटाची शूटिंग सुरु होण्यापूर्वीच चर्चेत आला आहे. त्याला कारण ही तसेच आहे अनुरागला स्वत:ला ...
.jpg)
अनुराग कश्यपला तयार करायचा आहे या वादग्रस्त व्यक्तीच्या आयुष्यावर चित्रपट
द ग्दर्शक अनुराग कश्यप त्याच्या आगामी चित्रपटाची शूटिंग सुरु होण्यापूर्वीच चर्चेत आला आहे. त्याला कारण ही तसेच आहे अनुरागला स्वत:ला लेखक आणि चित्रपट समीक्षक म्हणवू घेणाऱ्या वादग्रस्त कमाल आर खानच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार करायचा आहे.
अनुरागचे म्हणणे आहे की, जर कमाल खानचा बायोपिक तयार करण्यात आला तर त्याचे अधिकार मला मिळायला हवेत. केआरकेच्या आयुष्यावर आधारित चित्रपट मी पूर्ण प्रामाणिकपणे तयार करेन. कोणत्याही प्रकारची चालाखी मी करणार नाही. माझ्यापेक्षा जास्त प्रामाणिकपणे हा चित्रपट कुणी तयारच करु शकत नाही.
त्याचे झाले असे की अनुरागला विचारण्यात आले की तो हॉलिवूडचा द डिजास्टर आर्टिस्ट हा चित्रपट बघितला आहेस. जर या चित्रपटाच्या धर्तीवर बॉलिवूडमध्ये चित्रपट तयार करण्यात आला तर तो कोणावर येईल. त्यावर अनुरागने केआरकेचे नाव घेतला आणि त्याचा चित्रपट देशद्रोहीचे नाव घेतले. बॉलिवूडमध्ये डिजास्टर आर्टिस्ट कमाल आर खानवर हा चित्रपट तयार करण्यात येऊ शकतो.
केआरकेने आतापर्यंत तीन चित्रपट काम केले आहे तर टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन 3 चा स्पर्धक होता. बिग बॉसच्या घरात केलेल्या भांडणामुळे तो चर्चेत आला. ट्विटरवर केआर के नेहमीच काही तरी वादग्रस्त ट्वीट करत असतो किंवा ट्विटरवर बॉलिवूड स्टार्सला टार्गेट करून चर्चेत राहतो.
गत वर्षी केआरकेचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते. आमिर खानच्या ‘सीक्रेट सुपरस्टार' चित्रपटाबाबत केआरकेने वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांचे अकाऊंट सस्पेंड करण्यात आले. सिक्रेट सुपरस्टार हा चित्रपट अतिशय वाईट असून वडील आईप्रमाणे आपल्या मुलांवर प्रेम करत नाहीत हे या चित्रपटाद्वारे आमिर खान सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. अडीज तास हा चित्रपट आपल्याला अक्षरशः टॉचर करणार आहे. त्यामुळे या चित्रपटाला चित्रपटगृहं मिळू नयेत. असे ट्वीट त्यांने केले होते. त्याचे हे वक्तव्य त्याला चांगलेच महागात पडले होते. याआधी ही केआरकेने अनेक जणांसोबत पंगा घेतला होता.