another shock to kangana ranaut now the business head of the film manikarnika queen of jhansi is out | ‘मणिकर्णिका’चे वाद थांबेना! पुन्हा आला कंगना राणौतचा खुलासा!!
‘मणिकर्णिका’चे वाद थांबेना! पुन्हा आला कंगना राणौतचा खुलासा!!

आपल्या परखड वक्तव्यांसाठी  ओळखली जाणारी कंगना राणौत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाच्या निमित्ताने कंगनाने बरेच आरोप ओढवून घेतलेत. ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’च्या दिग्दर्शकाने अखेरच्या टप्प्यात चित्रपट सोडल्यानंतर कंगनाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली. पण कंगना प्रत्यक्ष दिग्दर्शन सुरु करते ना करते, तोच अभिनेता सोनू सूदने चित्रपटातून अंग काढून घेतले. कंगनाच्या उर्मट वागण्याला कंटाळून त्याने असे केल्याचे सांगितले गेले. आता अशीच एक बातमी आहे. होय, ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’च्या बिझनेस हेडची हकालपट्टी करण्यात आल्याची खबर आहे.
होय, झी स्टुडिओचे सुजय कुट्टी हे या चित्रपटाचे बिझनेस हेड होते. पण त्यांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलेय. त्यांना काढण्यामागचे कारण आहे, चित्रपटाचा वाढलेला बजेट. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचा बजेट ७० कोटी रूपये होता. पण चित्रपटाची काही सीन्स नव्याने शूट करण्याची परवानगी दिली गेली. त्यामुळे चित्रपटाचा बजेट १०० कोटींवर पोहोचला. पुढील १० दिवसांत चित्रपटाचे शूटींग होणार होते. पण आता या चित्रपटात व्यापक बदल केले जातील, अशी शक्यता आहे.
दरम्यान बिझनेस हेडला काढण्यात आल्याचे वृत्त पसरताच कंगनाला पुन्हा एकदा खुलासा देणे भाग पडले आहे.
बिझनेस हेडला काढण्याचा संबंध चित्रपटाशी जोडणे योग्य नाही, असे कंगनाने म्हटले आहे. बिझनेस हेडने फार पूर्वीच चित्रपट सोडला होता. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. हा चित्रपट एक स्टुडिओ साकारतो आहे. बजेटसाठी आपल्या कर्मचाऱ्यांना काढण्याऐवजी ते हा चित्रपट अन्य कुणाला विकूही शकतात, असे कंगनाने म्हटले आहे.


Web Title: another shock to kangana ranaut now the business head of the film manikarnika queen of jhansi is out
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.