अनिल कपूर 'फन्ने खान'मध्ये वाजवताना दिसणार हे म्युझिकल इंस्ट्रुमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 12:20 PM2018-07-17T12:20:56+5:302018-07-17T13:37:31+5:30

अनिल कपूर यांनी  1983 साली 'वो सात दिन' चित्रपटासाठी हार्मोनियमचे धडे गिरवून बॉलिवूडमधील करियरला सुरूवात केली होती.

Anil Kapoor will be seen playing musical instrument in 'Fanney Khan' | अनिल कपूर 'फन्ने खान'मध्ये वाजवताना दिसणार हे म्युझिकल इंस्ट्रुमेंट

अनिल कपूर 'फन्ने खान'मध्ये वाजवताना दिसणार हे म्युझिकल इंस्ट्रुमेंट

googlenewsNext
ठळक मुद्दे 'फन्ने खान' चित्रपटातून पहिल्यांदाच अनिल कपूर सोनमसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. 'फन्ने खान'मध्ये अनिल कपूर हार्मोनियमनंतर ट्रम्पेट वाजवताना दिसणार आहेत.

अभिनेता अनिल कपूर यांचा आगामी सिनेमा 'फन्ने खान'ची चर्चा सगळीकडे सुरू आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच बापलेक म्हणजेच अनिल कपूर सोनमसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. त्यात आता या सिनेमाच्या निमित्ताने त्यांना अभिनयाव्यतिरिक्त संगीताची आवड असल्याचे समोर आले आहे.


'फन्ने खान' चित्रपटात अनिल कपूर वडीलांच्या भूमिकेत दिसणार असून ज्यांना आपल्या मुलीला सिंगर बनवण्याची इच्छा असते. या सिनेमात त्यांच्या व सोनम व्यतिरिक्त ऐश्वर्या राय बच्चनराजकुमार रावदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अनिल कपूर देखील गायकाच्या भूमिकेत असून ते ट्रम्पेट हे वाद्य वाजवताना दिसणार आहे. यापूर्वी देखील त्यांनी म्युझिकल इंस्ट्रुमेंट हाताळले आहे. 
अनिल कपूर यांनी  1983 साली 'वो सात दिन' चित्रपटासाठी हार्मोनियमचे  धडे गिरवून बॉलिवूडमधील करियरला सुरूवात केली होती आणि आता ते 'फन्ने खान' सिनेमात ट्रम्पेट वाजवताना दिसणार आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये पस्तीस वर्षांचे कालांतर असले तरी आजही अनिल कपूर यांची म्युझिकल इंस्ट्रुमेंट शिकण्याची आवड कायम आहे. ज्याप्रमाणे तेे हार्मोनियम वाजवण्यात माहिर झाले होते. त्याप्रमाणे ते आता ट्रम्पेटमध्येही उस्ताद झाले आहेत. याबाबत ते सांगतात की, 'कठोर परिश्रमाची गरज होती. ट्रम्पेट माझ्या 'फन्ने खान'मधील पात्रांचा महत्त्वाचा हिस्सा होता आणि या चित्रपटात पूर्ण वेळ ट्रम्पेट माझ्यासोबत आहे. मी नवीन इंस्ट्रुमेंट शिकण्यासाठी उत्सुक होतो व मी रमेश कुमार गुरूंग यांच्याकडून प्रशिक्षण घेतले.'
अनिल कपूर यांनी 1971मध्ये रिलीज झालेला चित्रपट ' तू पायल मैं गीत'मध्ये त्यांनी सतार वाजवली आहे. मात्र ट्रम्पेट शिकणे खूप कठीण असल्याचे ते म्हणाले व पुढे सांगितले की,' इंस्ट्रुमेंट वाजवणे आणि अभिनयासोबत इंस्ट्रुमेंट वाजवणे या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. इंस्ट्रुमेंट वाजवताना हावभाव करणे चॅलेजिंग होते. मी साकारीत असलेले पात्र फन्ने जेव्हा केव्हा दुःखी किंवा आनंदी असेल तेव्हा तो ट्रम्पेट वाजवतो. त्यावेळी माझी भूमिका वास्तविक वाटण्याची गरज होती.'

Web Title: Anil Kapoor will be seen playing musical instrument in 'Fanney Khan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.