या गोष्टीचा अक्षय कुमारला आजही होता पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 09:00 PM2019-04-01T21:00:00+5:302019-04-01T21:00:02+5:30

अक्षय कुमारला काही वर्षांपूर्वी ऑफर करण्यात आलेल्या एका चित्रपटात त्याला काम करता आले नाही त्याचा आजही त्याला पश्चाताप होतो हे त्याने नुकतेच सांगितले आहे. 

Akshay Kumar regreted that he was offered Farhan Akhtar's role in Bhag Milkha Bhag but he can't do it due to Once Upon Time in Mumbai | या गोष्टीचा अक्षय कुमारला आजही होता पश्चाताप

या गोष्टीचा अक्षय कुमारला आजही होता पश्चाताप

googlenewsNext
ठळक मुद्देभाग मिल्खा भाग या चित्रपटातील मिल्खा सिंग या भूमिकेसाठी अक्षय कुमारला विचारण्यात आले होते. पण त्यावेळी अक्षय वन्स अपॉन अ टाईम या चित्रपटात काम करत होता आणि त्याचमुळे अक्षयने भाग मिल्खा भाग या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता.

अक्षय कुमारने गेल्या काही वर्षांत त्याचे एक प्रस्थ बॉलिवूडमध्ये निर्माण केले आहे, त्याचे चित्रपट म्हटले की ते १०० कोटीहून अधिक गल्ला जमवणार यात काहीच शंका नाही. सध्या त्याचा केसरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. त्याच्या या चित्रपटाने १२५ हून अधिक कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात त्याने हवालदार इशार सिंगची भूमिका साकारली होती. 

अक्षयची बॉलिवूडमध्ये एंट्री होऊन आता अनेक वर्षं झाली आहेत. त्याने एक अ‍ॅक्शन हिरो म्हणून बॉलिवूडमधील त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याचमुळे त्याला बॉलिवूडचा खिलाडी असे म्हटले गेले. त्यानंतर त्याने रोमँटिक चित्रपटांमध्ये काम केले. त्याचे अ‍ॅक्शन आणि रोमँटिक चित्रपट हिट होत असतानाच तो कॉमेडी चित्रपटांकडे वळला. त्याने त्याच्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. गेल्या काही वर्षांपासून सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांत काम करण्यांवर तो भर देत आहे. 

अक्षय कुमारने कधीच एकाच पठडीतील चित्रपटात काम केले नाही. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरच्या चित्रपटांची त्याला नेहमीच ऑफर येते. त्याला काही वर्षांपूर्वी ऑफर करण्यात आलेल्या एका चित्रपटात त्याला काम करता आले नाही त्याचा आजही त्याला पश्चाताप होतो हे त्याने नुकतेच सांगितले आहे. 

फरहान अख्तरची मुख्य भमिका असलेल्या भाग मिल्खा भाग या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी फरहानचे चांगलेच कौतुक झाले होते. तसेच त्याला या चित्रपटातील अभिनयासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. पण भाग मिल्खा भाग या चित्रपटासाठी दिग्दर्शक-निर्मात्यांची पहिली चॉईस फरहान नव्हे तर अक्षय कुमार होता. भाग मिल्खा भाग या चित्रपटातील मिल्खा सिंग या भूमिकेसाठी अक्षय कुमारला विचारण्यात आले होते. पण त्यावेळी अक्षय वन्स अपॉन अ टाईम या चित्रपटात काम करत होता आणि त्याचमुळे अक्षयने भाग मिल्खा भाग या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. मात्र या निर्णयाचा अक्षयला आजही पश्चाताप होतो अशी कबुली अक्षयने नुकत्याच एका कार्यक्रमात दिली आहे. 

 

Web Title: Akshay Kumar regreted that he was offered Farhan Akhtar's role in Bhag Milkha Bhag but he can't do it due to Once Upon Time in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.