रणवीर सिंगच्या ‘८३’ मध्ये आता लागली 'या' अभिनेत्याची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 05:08 PM2019-05-24T17:08:37+5:302019-05-24T17:09:32+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून रणवीर सिंगचा ‘८३’ सिनेमा चर्चेत आहे.'८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. यात रणवीर सिंग कपील देव यांची भूमिका साकारणार आहे.

'83: Dinkar sharma will play kirti Azad in ranveer singh starrer | रणवीर सिंगच्या ‘८३’ मध्ये आता लागली 'या' अभिनेत्याची वर्णी

रणवीर सिंगच्या ‘८३’ मध्ये आता लागली 'या' अभिनेत्याची वर्णी

googlenewsNext
ठळक मुद्दे१९८३चा विश्वचषक जिंकण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती‘८३’ सिनेमाचे शूटिंग 5 जूनपासून स्कॉटलँडमधल्या ग्लासगोमध्ये सुरु होणार आहे

गेल्या अनेक दिवसांपासून रणवीर सिंगचा ‘८३’ सिनेमा चर्चेत आहे.'८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. यात रणवीर सिंग कपील देव यांची भूमिका साकारणार आहे.दिग्दर्शक कबीर खान या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमात आता आणखी एक अभिनेत्याची वर्णी लागली आहे. क्रिकेटर किर्ती आझाद यांच्या भूमिकेत दिनकर शर्मा दिसणार आहे. १९८३चा विश्वचषक जिंकण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.  


‘८३’ सिनेमाचे शूटिंग 5 जूनपासून स्कॉटलँडमधल्या ग्लासगोमध्ये सुरु होणार आहे. रणवीर सिंग आणि त्याच्या 83 सिनेमाच्या संपूर्ण टीमला नुकतेच धर्मशालामध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडिओत रणवीर क्रिकेटमधले बारकावे शिकताना दिसला होता. स्वत: कपिल देव या व्हिडीओत रणवीर सिंगला क्रिकेटचे धडे देताना दिसले होते. रणवीरने देखील या कॅम्पमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या व्हिडिओत सिनेमाचा दिग्दर्शक कबीर खानसुद्धा दिसला होता. 


क्रिकेट वर्ल्डकप १९८३ भारतासाठी विशेष होता. बलाढ्य वेस्ट इंडिज टीमला फायनलमध्ये चारीमुंड्या चीत करत कपिल देव यांच्या नेतृत्वातील भारतीय टीमने वर्ल्डकप जिंकण्याचा भीमपराक्रम केला होता. या ऐतिहासिक विजयामुळे तमाम भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. कपिल देव यांच्या त्या भारतीय टीमचं नाव सुवर्णाक्षरांनी क्रिकेट इतिहासात नोंदवलं गेलं.


आता भारतीय क्रिकेट टीमचा पहिला वर्ल्डकप जिंकल्याचा हाच पराक्रम रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता लागली आहे. मात्र हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना १० एप्रिल, २०२० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Web Title: '83: Dinkar sharma will play kirti Azad in ranveer singh starrer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.