lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 10-May-24

राशी भविष्य

 कुंभ

कुंभ

ह्या आठवड्यात आपल्या जीवनात आधीपासून चालत असलेल्या समस्या दूर होऊ लागल्याचे आपणास जाणवेल. मित्रांच्या मदतीने आपण सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या कारकीर्दीस नवीन दिशा देण्यासाठी काही नवीन योजना आखाल, ज्यांची अंमल बजावणी करण्यासाठी आपणास आपल्या माणसांचे समर्थन सुद्धा प्राप्त होईल. वैवाहिक जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. त्यांच्या चांगल्यासाठी आपण काम करत असल्याचे दिसून येईल. आठवड्याच्या मध्यास आपणास अचानकपणे दूरवरचा प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास सुखद व नवीन संबंध जोडणारा असेल. ह्या आठवड्यात घर दुरुस्ती किंवा सजावटीसाठी अपेक्षेहून जास्त खर्च संभवतो. अर्थात त्याच्या जोडीने प्राप्तीचे नवीन स्रोत दिसल्याने पैश्याची काळजी वाटणार नाही. आठवड्याचा उत्तरार्ध थोडा व्यस्ततेचा असू शकतो. ह्या दरम्यान कामाच्या ठिकाणी अचानकपणे आपल्या खांद्यावर मोठा भार येऊ शकतो, व त्याची पूर्तता करण्यासाठी आपणास आपले सर्व कार्यक्रम रद्द करावे लागू शकतात. ह्या दरम्यान घरातील व बाहेरील व्यक्तींसह राहणे आपल्या हिताचे होईल. प्रणयी जीवन सामान्यच राहील. जीवनातील कठीण समयी वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आपली आर्थिक स्थिती खूप चांगली राहील. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे.

राशी भविष्य

10-05-2024 शुक्रवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ तृतीया

नक्षत्र : रोहिणी

अमृत काळ : 07:40 to 09:18

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 8:27 to 9:15 & 14:51 to 15:39

राहूकाळ : 10:55 to 12:32