lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 10-May-24

राशी भविष्य

 सिंह

सिंह

हा आठवडा आपली थोडी गैरसोय करणारा आहे. ह्या आठवड्यात आपणास मनोबल कमी असल्याचे जाणवेल. केलेल्या कामांचे परिणाम मिळण्यास विलंब होऊ शकतो. वैवाहिज जीवनात आपल्या कौटुंबिक स्थितीमुळे कलह निर्माण होऊ शकतो. असे असून सुद्धा कुटुंबियांचे सहकार्य आपणास कठीण समयी लढण्याचे बळ प्रदान करेल. अचानकपणे लहान - सहान प्रवास होण्याची संभावना आहे. व्यापारी सहकारी आपणास नवीन संधी उपलब्ध करून देतील. ह्या आठवड्यात केलेली आर्थिक गुंतवणूक भविष्यासाठी चांगली संधी व आर्थिक लाभ प्रदान करेल. आकस्मिक घटनांचा जास्त सामना करावा लागेल. विद्यार्थ्यांना एकाग्रतेवर लक्ष ठेवावे लागेल. जास्तीचे मिळविण्याच्या नादात जुना अभ्यास सुटणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. जास्त धावपळ झाल्याने आरोग्यावर सुद्धा नियंत्रण ठेवावे लागेल. शरीरातील पाणी व लोह कमी झाल्याने रोग होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा कठीणच आहे. वरिष्ठांशी वाद संभवतात. आठवड्याच्या उत्तरार्धात आपले कुटुंबीय व मित्र यांच्यावर आपला प्रभाव ठसा उमटवून टाकेल. हा आठवडा आपल्यासाठी काही शिकून घेण्याचा आहे. आर्थिक उन्नती बरोबरच भविष्याची दिशा हा आठवडा नक्की करेल.

राशी भविष्य

10-05-2024 शुक्रवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ तृतीया

नक्षत्र : रोहिणी

अमृत काळ : 07:40 to 09:18

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 8:27 to 9:15 & 14:51 to 15:39

राहूकाळ : 10:55 to 12:32