lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 11-May-24

राशी भविष्य

 सिंह

सिंह

हा महिना आपल्यासाठी चांगला आहे. महिन्याच्या सुरवातीस आपणास कौटुंबिक व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. बाजारात आपली पत वाढेल. लोकांच्या दृष्टीने आपण प्रसिद्ध व्हाल. धार्मिक कार्यात सुद्धा आपला हातभार असेल. ह्या महिन्यात आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा सुद्धा वाढेल. जमीन - जुमल्याच्या बाबतीत यश प्राप्ती होईल. नोकरी करणाऱ्यांना सावध राहून कामे करावी लागतील. इमानदारीने आपली कामे करावी, अन्यथा समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. प्रणयी जीवनासाठी महिना चढ - उतारांचा आहे. आपण व आपली प्रेमिका दरम्यानचा समन्वय कमी होऊ शकतो. ह्यास कारणीभूत तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप असू शकतो. अशा वेळी आपणास सावध राहण्याची आवश्यकता आहे. विवाहितांना त्यांचे वैवाहिक जीवन आनंदित असल्याचे जाणवेल. आपण ज्याच्याशी विवाह केला आहे ती व्यक्ती आपल्यासाठी अत्यंत योग्य असल्याची जाणीव आपणास होईल. असे झाल्यामुळे आपल्यातील प्रेम वृद्धिंगत होईल. हा महिना विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. अभ्यासासाठी आपण दुसऱ्या शहरात सुद्धा जाऊ शकता. ह्या महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी भविष्य

11-05-2024 शनिवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ चतुर्थी

नक्षत्र : मृगशीर्ष

अमृत काळ : 06:02 to 07:40

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 7:38 to 8:26

राहूकाळ : 09:17 to 10:55