lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 12-May-24

राशी भविष्य

 मिथुन

मिथुन

हा महिना आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण आपल्या योजना पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. आपल्या योजना चांगल्या प्राप्तीचे स्रोत सुद्धा आपणास उपलब्ध करून देतील. त्यामुळे आपल्या प्राप्तीत तेजी असल्याचे दिसून येईल. थकबाकी मिळेल. आपली स्थगित कामे सुद्धा सुरु होतील. आपण लोकांना मदत करण्यासाठी सुद्धा पैसा खर्च कराल व त्यामुळे समाजात आपण सन्मानित व्हाल. जमीन - जुमल्याच्या बाबतीत लाभ होईल. आपण नवीन प्रॉपर्टी खरेदी करू शकता. नोकरी करणाऱ्यांना कामात मजा येईल. आपण मन लावून व आपले पूर्ण योगदान देऊन कामे कराल. व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना अनुकूल आहे. आपल्या व्यापारात उन्नती होत असल्याचे दिसून येईल. आपण एखादे नवीन काम सुद्धा सुरु करू शकता. वैवाहिक जीवनातील तणाव कमी होऊन व्यक्तिगत जीवनात सुधारणा होईल. आपण व आपला वैवाहिक जोडीदार या दरम्यान उत्तम समन्वय साधला जाईल. असे असून सुद्धा आपला कल विवाहबाह्य संबंधांकडे होऊ शकतो, तेव्हा काळजी घ्यावी. प्रणयी जीवनासाठी महिना अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना लक्षपूर्वक अध्ययन केल्यासच चांगले परिणाम मिळतील. मित्रांच्या सहवासात जास्त वेळ घालवून आपलेच नुकसान करून बसाल. महिन्याचे सुरवातीचे दिवस व अखेरचा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी भविष्य

11-05-2024 शनिवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ चतुर्थी

नक्षत्र : मृगशीर्ष

अमृत काळ : 06:02 to 07:40

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 7:38 to 8:26

राहूकाळ : 09:17 to 10:55