lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 10-May-24

राशी भविष्य

 वृषभ

वृषभ

हा महिना आर्थिक दृष्ट्या काहीसा त्रासदायी होऊ शकतो. गुरु, सूर्य व शुक्राच्या प्रभावाने ह्या महिन्यात खर्चात खूप वाढ होण्याची संभावना असून हि वाढ पेलण्यास आपण असमर्थ असाल. त्यामुळे आपल्या खिशावर ताण येऊन आपली आर्थिक स्थिती खालावली जाईल. असे असले तरी मंगळ, बुध व राहू प्राप्तीत वाढ करण्यास मदत करतील, तेव्हा आपण हे समजू शकता कि चांगली प्राप्ती होऊन सुद्धा संपूर्ण प्राप्ती खर्च होऊ शकते. आपण जर ह्याकडे लक्ष दिले नाही तर आपणास पश्चाताप होऊ शकतो. बचत करणे हा त्यास एकमेव पर्याय आहे. एखाद्या नवीन योजनेत पैसे गुंतवल्याने आपणास फायदा होईल. हा महिना प्रणयी जीवनास काहीसा प्रतिकूल आहे. विवाहितांसाठी महिना उत्तम आहे. आपण एकमेकांना पूरक होईल असे काम केल्यास दोघांचाही फायदा होईल. प्रकृती उत्तम राहिली तरी अधून - मधून एखादी छोटी समस्या आपणास त्रस्त करू शकते. बाहेरगावी जाण्यात यशस्वी होऊ शकता. परदेशातून चांगली प्राप्ती होऊ शकते. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील व त्यामुळे त्यांना चांगले परिणाम मिळतील.

राशी भविष्य

10-05-2024 शुक्रवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ तृतीया

नक्षत्र : रोहिणी

अमृत काळ : 07:40 to 09:18

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 8:27 to 9:15 & 14:51 to 15:39

राहूकाळ : 10:55 to 12:32