lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 10-May-24

राशी भविष्य

 मीन

मीन

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत शुभ आहे. ह्या आठवड्यात आपण आपल्या क्षमतेचा उत्तम उपयोग करत असल्याचे दिसून येईल. आपण आपल्या जीवनात मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा उचलण्यात यशस्वी व्हाल. आठवड्याच्या सुरवातीस कारकिर्दीशी संबंधित एखादी शुभ वार्ता आपणास समजेल. पदोन्नतीमुळे निव्वळ कार्यक्षेत्रातच नाही तर कुटुंबात सुद्धा मान - सन्मान वाढेल. व्यापाऱ्यांना एखादा चांगला सौदा हाती लागू शकतो. बाजारात अचानकपणे आलेल्या तेजीमुळे आपणास खूप फायदा होईल. ह्या आठवड्यात आपणास स्वजनांसह हसत - खेळत वेळ घालविण्याच्या भरपूर संधी मिळतील. आठवड्याच्या मध्यास एखाद्या धार्मिक किंवा मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतात. विवाहितांना घरात नवांतूकाचे आगमन होण्याची शुभ बातमी मिळू शकते. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. एखाद्या स्त्रीशी झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. जे आधीपासून प्रेमात आहेत त्यांचे प्रेम संबंध दृढ होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रवासासाठी भरपूर पैसा खर्च होईल. आपल्या व्यस्त जीवन शैलीतून सुद्धा स्वतःसाठी थोडा वेळ काढाल.

राशी भविष्य

10-05-2024 शुक्रवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ तृतीया

नक्षत्र : रोहिणी

अमृत काळ : 07:40 to 09:18

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 8:27 to 9:15 & 14:51 to 15:39

राहूकाळ : 10:55 to 12:32