लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून आठ उमेदवार जाहीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2024 01:47 PM2024-03-27T13:47:28+5:302024-03-27T13:48:33+5:30

ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

vanchit bahujan aghadi announced eight candidates for the lok sabha elections 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून आठ उमेदवार जाहीर!

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून आठ उमेदवार जाहीर!

राजरत्न सिरसाट, लाेकमत न्यूज नेटवर्क, अकोला : लोकसभा निवडणुकीसाठी ‘वंचित’ कडून आठ उमेदवारांची यादी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवार,२७ मार्च राेजी  जाहीर केली. जरांगे पाटील व ओबीसी महासंघाचे प्रकाश अण्णा शेंडगे यांच्यासोबत चर्चा करून पुढील उमेदवार जाहीर करणार असल्याचे स्पष्ट करताना नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन महाविकास आघाडीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे.

पहिल्या टप्प्यातील जे 'वंचित'चे उमेदवार आहेत त्यांना जरांगे पाटील यांचे समर्थन आहे. याबाबत मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात उपेक्षितांची, वंचितांची आणि गरीब मराठा, मुस्लीम यांची राजकीय,सामाजिक अशी ही नवीन परिवर्तनाची वाटचाल आहे. या वाटचालीला राज्यातील हा समूह आम्हाला पाठिंबा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.वंचित बहुजन आघाडीचा वापर हे घराणेशाही वाचवण्यासाठी आम्ही हाेऊ देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

उर्वरित जागांची अंतिम यादी ही २ एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करताना मनोज जरांगे यांच्यासोबत झालेल्या चर्चेविषयी बोलताना आंबेडकर यांनी परिवर्तनाच्या राजकारणाला नव्याने सुरुवात करण्याची चर्चा झाली असून, जास्तीत जास्त उमेदवार हे गरीब समुदायातील असतील आणि त्यांनाच पुढे आणले जाईल,मुस्लीम आणि जैन समुदायालाही उमेदवारी दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

आपल्या संघटनेच्या माध्यमातून आणि लोकांच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये कशा प्रकारे भाग घ्यायचा? आणि त्यात काय भूमिका घ्यायची? यावर त्यांनी लोकांचा निर्णय मागितला आहे. ३० मार्चनंतर काही जागांबाबत आम्ही दोघे मिळून निर्णय घेणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला यावेळी बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, ज्येष्ठ नेते अशोक सोनोने, राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे, प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश प्रवक्ता फारुख अहमद, महिला आघाडी राज्य महासचिव अरुंधती सिरसाट, राज्य प्रवक्ता राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्यासह राज्य कार्यकारणी आणि पदाधिकारी उपस्थिती होते.

- प्रकाश शेंडगे यांना पाठींबा

ओबीसी बहुजन संघटनेचे नेते प्रकाश शेंडगे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून, ते सांगली लाेकसभा मतदार संघातून उभे राहिल्यास त्यांना ‘वचिंत‘कडून पाठींबा दिला जाणार असल्याचे अॅड आंबेडकर यांनी सांगितले.गरीब मराठा,ओबीसी,मुस्लीम, धार्मिक अल्पसंख्याक जैन या सर्व समाज घटकांना साेबत घेऊन राज्यात नवे,राजकीय, सामाजिक समिकरण उभे करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

-नागपुरातील काॅंग्रसेच्या उमेदवारास पाठींबा

नागपूर १० क्रमांकाच्या-लाेकसभा मतदार संघातील भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेसच्या उमेदवाराला अॅड आंबेडकर यांनी पाठींबा जाहीर करून युतीबाबतचा सस्पेंस त्यांनी कायम ठेवला आहे.

- ग्रामीण भागात राेजगार निर्माण व्हावा

शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत प्रमाणे दर मिळावे त्यासाठीचा कायदा व्हावा, ग्रामीण भागात कृषीवर आधारित प्रक्रिया उद्याेग,कारखाने निर्माण हाेऊन ग्रामीण तरूण,युवकांना राेजगार मिळावा, यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. या व इतर महत्वाच्या विषयावर मनाेज जरांगे पाटील यांच्यासाेबत चर्चा हाेऊन समझाेता झाला आहे. जरांगे पाटील याबाबत सहमत हाेऊन या विषयावर ते साेबत राहणार असल्याचेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

-हे आहेत उमेदवार

अकाेला लाेकसभा मतदार संघ- अॅड प्रकाश यशवंत आंबेडकर, भंडारा गाेंदिया-संजय गजानंद केवट, गडचिराेली-चिमूर हितेश पांडुरंग मडावी, चंद्रपूर राजेश वारलुजी बेल्ले, बुलढाणा- वसंत राजाराम मगर, अमरावती कुु. प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवार,वर्धा- प्रा.राजेंद्र सांळुके,यवतमाळ- वाशिम सुभाष खेमसींग पवार,

Web Title: vanchit bahujan aghadi announced eight candidates for the lok sabha elections 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.