स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळले; महागाव तालुक्यात उडाली खळबळ
By रवींद्र चांदेकर | Updated: September 15, 2022 18:28 IST2022-09-15T18:25:29+5:302022-09-15T18:28:12+5:30
नवजात अर्भक मृतावस्थेत आढळले

स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळले; महागाव तालुक्यात उडाली खळबळ
महागाव (यवतमाळ) : तालुक्यातील गुंज येथील साखर कारखाना परिसरात एक नवजात अर्भक मृतावस्थेत आढळले. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
गुंज परिसरात साखर कारखाना आहे. या परिसरातील सवना ते गुंज दरम्यान एक नवजात मृत अर्भक बेवारस स्थितीत आढळून आले. साखर कारखान्याच्या सुरक्षा रक्षकाला लाल-पिवळ्या कापडात गुंडाळलेले स्त्री जातीचे मृत अर्भक दिसून आले. त्यांनी लगेच पोलीस पाटील तुकाराम भोने यांना माहिती दिली.
भोने यांनी महागाव पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अर्भकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवना ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध भादंवि ३१८ कलमानुसार गुन्हा दाखल केला.