अन् मुलीपाठोपाठ आईनेही सोडले प्राण; माय-लेकीच्या मृत्यूने सारे गाव हळहळले

By रवींद्र चांदेकर | Updated: September 8, 2022 17:57 IST2022-09-08T17:38:54+5:302022-09-08T17:57:03+5:30

माय-लेकीचा मृत्यूने शिंदे कुटुंबाला मोठा धक्का

mother dies 1 day after daughter's death in yavatmal | अन् मुलीपाठोपाठ आईनेही सोडले प्राण; माय-लेकीच्या मृत्यूने सारे गाव हळहळले

अन् मुलीपाठोपाठ आईनेही सोडले प्राण; माय-लेकीच्या मृत्यूने सारे गाव हळहळले

यवतमाळ : महागाव तालुक्यातील हिवरा संगम  येथे लाडक्या मुलीच्या मृत्यूनंतर अवघ्या एका दिवसाच्या अंतराने आईनेही जगाचा निरोप घेतला. ही घटना महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे घडली असून या घटनेने गावात शोककळा पसरली.

हिवरा संगम येथील समाधान शिंदे आणि मीनाताई शिंदे (वय ३१) यांच्या संसारवेलीवर अपूर्वा नावाचे फूल उमलले होते. अपूर्वा अवघ्या नऊ वर्षांची होती. ५ सप्टेंबरला अल्पशा आजाराने अपूर्वाचा मृत्यू झाला. हा धक्का तिची आई मीनाताई यांना सहन झाला नाही. मुलीच्या वियोगातच त्यांनीही ७ सप्टेंबरला जगाचा निरोप घेतला. अवघ्या एका दिवसाच्या अंतराने शिंदे कुटुंबातील माय आणि लेक मृत्यू पावले. त्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला.

मीनाताई शिंदे हिवरा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य होत्या. अपूर्वा ही एकुलती मुलगी होती. समाधान व मीनाताई यांना एक मुलगासुद्धा आहे. मात्र अपूर्वा व मीनाताई यांच्या मृत्यूमुळे शिंदे कुटुंबीयांवर आभाळ कोसळले. दोघींनाही किडनीचा त्रास असल्याचे सांगितले जाते. त्याच आजारात एक दिवसाच्या अंतराने मायलेकींचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे हिवरा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: mother dies 1 day after daughter's death in yavatmal