Lok Sabha Election 2019; तीर्थरूप बाबा, पत्रास कारण की... मतदानाला जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:04 PM2019-04-10T12:04:25+5:302019-04-10T12:08:26+5:30

तीर्थरूप बाबा, पत्रास कारण की, ११ तारखेला लोकसभेसाठी मतदान होणार आहे. तुम्ही न चुकता मतदानाला जा... असे पोस्टकार्ड पत्र घरोघरी पोहोचले  आणि राष्ट्रीय कर्तव्याची आठवण होऊन ग्रामीण पालकांनी मुलांच्या पत्रलेखनाचे कौतुकही दाटून आले.

Lok Sabha Election 2019; Respected father, the reason for the letter ... go to the voting! | Lok Sabha Election 2019; तीर्थरूप बाबा, पत्रास कारण की... मतदानाला जा!

Lok Sabha Election 2019; तीर्थरूप बाबा, पत्रास कारण की... मतदानाला जा!

Next
ठळक मुद्देचिमुकल्यांचे आग्रहपत्रपत्र मिळताच पालकांचा ऊर भरून आला

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :  तीर्थरूप बाबा, पत्रास कारण की, ११ तारखेला लोकसभेसाठी मतदान होणार आहे. तुम्ही न चुकता मतदानाला जा... असे पोस्टकार्ड पत्र घरोघरी पोहोचले  आणि राष्ट्रीय कर्तव्याची आठवण होऊन ग्रामीण पालकांनी मुलांच्या पत्रलेखनाचे कौतुकही दाटून आले.
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान होणार आहे. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रशासन विविध प्रयत्न करीत आहेत. मात्र चिखली इजारा (ता. आर्णी) शाळेतील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनोखा प्रयोग केला. गावातल्या पोस्ट आॅफिसमधून ३७ विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्ड विकत आणले. शिक्षक विनोद दुधे यांच्या मार्गदर्शनात सर्वांनी बाबाच्या नावाने पत्र लिहून काढले. बाबाने आवर्जुन नेणे मतदानाला जावे असा आग्रह पत्रातून केला आहे. ही सारे पत्रे शिक्षकांनी पोस्टात नेऊन टाकले. ही पत्रे सोमवारी ही पत्रे पोस्टमनने घरोघरी पत्रे पोहोचविल्यावर बाबा लोकांना अपार आनंद झाला. अनेकांनी शाळेत पोहोचून आम्ही जरून मतदान करणार असल्याचे निर्धार व्यक्त केले.

ईमेल नाही पत्रच लिहिले...
एसएमएस, इमेल, व्हॉटस्अ‍ॅपच्या काळात २५ पैशाचे पोस्टकार्ड मागे पडले. मात्र चिकणीच्या विद्यार्थ्यांनी आई-वडिलांना पोस्ट कार्डवर पत्र लिहिले.

ताजा कलम
प्रत्येक विद्यार्थ्याने पत्र लिहिताना ताजा कलम लिहिला. यात बाबा मतदानाला जाताना मतदानकार्ड जरूर घेऊन जा, असे लिहिले आहे. तर काही जणांनी मतदानाविषयी कविताही ताजा कलममध्ये लिहिल्या आहेत.

Web Title: Lok Sabha Election 2019; Respected father, the reason for the letter ... go to the voting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.