Next

कोथरूडकर जावयाचा पाहुणचार करतील, घरजावई करून घेणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 03:44 PM2019-10-03T15:44:45+5:302019-10-03T15:44:51+5:30

कोथरूडची जनता सुज्ञ आहे, ते जावयाचा पाहुणचार करून परत पाठवतील. मात्र त्यांना ठेवून घेणार नाही असेअसे वक्तव्य कोथरूडमधील मनसेचे उमेदवार ...

कोथरूडची जनता सुज्ञ आहे, ते जावयाचा पाहुणचार करून परत पाठवतील. मात्र त्यांना ठेवून घेणार नाही असेअसे वक्तव्य कोथरूडमधील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पाठोपाठ मनसेचे शिंदे यांनीही आज एक अर्ज भरला. तर दुसरा अर्ज ते उद्या शुक्रवारी शक्तिप्रदर्शन करून भरणार आहेत. बुधवारी चंद्रकांत पाटील यांनी आयात उमेदवार विषयावर 'मी परका नसून पुण्याचा जावई आहे' असे वक्तव्य केले होते. त्याला आता शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे.