Next

... म्हणून चालवली राज ठाकरेंनी कार्यकर्त्याची गाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 03:44 PM2019-10-09T15:44:56+5:302019-10-09T15:46:35+5:30

विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर असल्याने सर्वच राजकीय पक्ष प्रचाराला लागले आहेत. राज ठाकरे आज पुण्यात सभा घेणार असून आजच्या ...

विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर असल्याने सर्वच राजकीय पक्ष प्रचाराला लागले आहेत. राज ठाकरे आज पुण्यात सभा घेणार असून आजच्या सभेपासून ते प्रचाराचा नारळ फाेडणार आहेत. राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं नातं सर्वांना माहित आहे. ठाकरेंच्या एका कार्यकर्त्यांने दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी कार घेतली त्याचे उद्घाटन करण्याची विनंती त्याने ठाकरे यांना केली. ठाकरेंनी सुद्धा त्याच्या विनंतीला मान देत त्याची गाडी चालवून त्याला शुभेच्छा दिल्या. आपल्या नेत्याने आपल्या पहिल्या गाडीचे उद्घाटन केल्याने कार्यकर्त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.