Maharashtra Election 2019 : वाशिम मतदारसंघात ‘वंचित’चे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 02:12 PM2019-10-05T14:12:16+5:302019-10-05T14:12:22+5:30

मुख राजकीय पक्षाच्या उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे.

Maharashtra Election 2019: Challenge of 'Vanchit' in Washim constituency! |  Maharashtra Election 2019 : वाशिम मतदारसंघात ‘वंचित’चे आव्हान!

 Maharashtra Election 2019 : वाशिम मतदारसंघात ‘वंचित’चे आव्हान!

Next

- नंदकिशोर नारे 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राजकीय पक्षाच्यावतिने देण्यात आलेल्या उमेदवारीबाबत पक्षातीलच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे उमेदवारांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. राजकीय पक्षातील नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते वंचितच्या उमेदवारासोबत जुळतांना दिसून येत असल्याने प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे.
युती, आघाडी झाल्यानंतर बंडखोरी होणार नसल्याचे पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात येत होते. परंतु राजकीय पक्षाच्यावतिने उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवार नाखुष झालेत. वाशिम विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्यावतिने पक्षाशी एकनिष्ठ असलेले, अनेक दिवसांपासून पक्षासाठी रात्रंदिवस झटणारे पदाधिकारी व कार्यकर्ते उमेदवारी मिळविण्याच्या तयारीत होते. निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या काँग्रेसमधील उमेदवारांना आपणापैकी कोणाला तरी उमेदवारी जाहीर होईल असे अपेक्षित असतांना वेळेवर नवख्या उमेदवार रजनी राठोड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारीवर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शविली. तसेच या संदर्भात बैठकांचे आयोजन केले. काही पदाधिकारी यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. काहींनी पुढे न येता उमेदवारीमध्ये देवाण-घेवाव केल्याचाही आरोप करण्यात आला. काँग्रेसमधील इच्छूकांना उमेदवारी न मिळाल्याने ते एकत्र आलेत व रणनिती आखतांना दिसून येत आहेत. यातील काही जण आज वंचितकडून उमेदवारी देण्यात आलेल्या डॉ. सिध्दार्थ देवळे यांच्यासोबत असल्याची चर्चा होत असल्याने काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिलेले सिध्दार्थ देवळे यांच्या संपर्कात काँग्रेसचे काही नेते, पदाधिकारी त्यांना उमेदवारी देण्यासाठी संपर्कात होते. परंतु नेमकी काय घडामोड झाली व त्यांना डावलण्यात आलेत. या संधीचा फायदा घेत वंचितच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून उमेदवारी जाहीर केली. भाजपा-शिवसेना युती असतांना गत निवडणुकीत व्दितीय क्रमांकावर राहिलेले शिवसेनेचे उमेदवार निलेश पेंढारकर यांनी यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली. यामध्ये भाजपाच्या मताचे विभाजन होवून याचा फायदा वंचित आघाडीला होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे.
काँग्रेसमधील नाखुष पदाधिकारी व कार्यकर्ते, भाजपा व शिवसेनेचे अपक्ष म्हणून निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांमुळे होणारी मताची विभागणी कोणाच्या पथ्यावर पडते यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगतांना दिसून येत आहेत.

चौरंगी लढतीचे चित्र
वाशिम विधानसभा गत २०१४ च्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाली होती. तिरंगी लढतीमध्ये प्रमुख पक्षाच्या तीनही उमेदवारांमध्ये ४ ते ५ हजाराचा फरक होता. यावेळी वंचित आघाडीच्या उमेदवारामुळे चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. गत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना व काँग्रेस उमेदवारांमध्ये लढत झाली होती. यामध्ये भाजपाच्या उमेदवाराला ४८१९६, शिवसेनेच्या उमेदवाराला ४३८०३ तर काँग्रेसच्या उमेदवाराला ३५९६८ मते मिळाली होती. यावेळीही या पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. फक्त शिवसेना पक्षावर गत निवडणुकीत असलेले उमेदवार हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. यावेळी वंचित आघाडीने निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने चौरंगी लढतीचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Challenge of 'Vanchit' in Washim constituency!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.