मतदानाची संधी छान, चला उंचावूया राष्ट्राचा मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 08:05 IST2025-12-29T08:05:18+5:302025-12-29T08:05:18+5:30
प्रभाग समिती ए, ई मध्ये मतदान जनजागृती रॅली

मतदानाची संधी छान, चला उंचावूया राष्ट्राचा मान
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा वसई-विरार पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने स्वीप अंतर्ग मतदान जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.
मतदानाची टक्केवारी हेतूने वाढावी, या जनजागृती रॅली काढली जात आहे. 'मतदानाची संधी छान, उंचावू राष्ट्राचा मान', 'ना जातीवर, ना धर्मावर बटण दाबा कार्यावर', अशा घोषफलकांद्वारे जागरूकता केली जात आहे. या रॅलीत स्वच्छता कर्मचारी व स्वच्छता निरीक्षक यांनी विशेष सहभाग घेतला होता.
मतदान करण्याचे आवाहन
मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून मतदान करावे, हा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रमांतर्गत २६ डिसेंबरला मनपाच्या प्रभाग समिती ए बोळींज व प्रभाग समिती ई नालासोपारामार्फत जागृती रॅलीचे आयोजन केले होते. यात सामान्य नागरिकही सहभागी झाले होते. रॅलीत प्रशासकीय कर्मचाऱ्यांसह विद्यार्थीही सहभागी झाले होते.