‘त्याने’ कारच केल्या पिवळ्याधमक; वसई-विरारमध्ये ठरतोय चर्चेचा विषय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 10:32 IST2026-01-09T10:32:32+5:302026-01-09T10:32:32+5:30
मतदानाला अवघे सात दिवस शिल्लक असताना बविआच्या उमेदवाराच्या या कार मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

‘त्याने’ कारच केल्या पिवळ्याधमक; वसई-विरारमध्ये ठरतोय चर्चेचा विषय
सफेद, काळ्या, निळ्या, लाल, चंदेरी रंगांच्या गाड्या सर्रास रस्त्यावर दिसतात मात्र वसई-विरारच्या रस्त्यावरून गेल्या काही दिवसांत धावणाऱ्या दोन पिवळ्या रंगाच्या आलिशान कार चर्चेचा विषय ठरत आहेत. या कार प्रभाग क्रमांक ८-क मधील बविआच्या उमेदवार पंकज पाटील यांच्या असून, आपल्या प्रचारासाठी त्यांनी कार पिवळ्या रंगात रंगवल्या आहेत.
एक नव्हे तर त्यांनी आपल्या दोन्ही कार पिवळ्याधमक केल्या आहेत. त्यावर पक्षाचे नाव आणि चिन्ह देखील रेखाटले आहे. सर्व पक्षीय उमेदवारांनी विविध पद्धतीने आपला प्रचार सुरू केला असताना बविआच्या उमेदवाराच्या या कार लक्ष वेधून घेत आहेत. मतदानाला अवघे सात दिवस शिल्लक असताना बविआच्या उमेदवाराच्या या कार मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.