वसईत ट्विस्ट, मुलगा शिंदेसेनेतून; तर वडील भाजपमधून लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:20 IST2026-01-05T13:19:01+5:302026-01-05T13:20:07+5:30
वसईत निवडणुकीत असा द्विस्ट पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.

वसईत ट्विस्ट, मुलगा शिंदेसेनेतून; तर वडील भाजपमधून लढणार
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : वसई-विरार महापालिका निवडणुकीत एकाच घरात मुलाला शिंदेसेनेतून; तर वडिलांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. वसईत निवडणुकीत असा द्विस्ट पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.
प्रभाग २८ अ मध्ये भाजपतर्फे वडील नितीन जगन्नाथ ठाकूर यांना उमेदवारी मिळाली आहे. तर प्रभाग २९ क मधून मुलगा यशोधन नितीन ठाकूर यांना शिंदेसेनेची उमेदवारी मिळाली आहे. हे दोघेही पूर्वी बहुजन विकास आघाडीमध्ये होते. काही दिवसांपूर्वी वडील भाजपमध्ये व मुलगा शिंदेसेनेत आले आहेत.