तेलाच्या टँकरने घेतला पेट, घटनास्थळाजवळ होते दोन पेट्रोलपंप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 19:01 IST2021-01-02T19:01:04+5:302021-01-02T19:01:14+5:30
काही वर्षांपूर्वी चारोटी येथील घडलेल्या टँकर स्फोटाच्या आठवणी स्थानिकांनी बोलून दाखवल्या.

तेलाच्या टँकरने घेतला पेट, घटनास्थळाजवळ होते दोन पेट्रोलपंप
अनिरुद्ध पाटील
बोर्डी - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर डहाणू तालुक्यातील आंबोली येथे शनिवार, दि. 2 जानेवारी रोजी तेलाच्या टँकरने संध्याकाळी 6: 00 वाजताच्या सुमारास पेट घेतला. ज्या ठिकाणी टँकरने पेट घेतला, त्याच ठिकाणी दोन्ही बाजूने पेट्रोल पंप असून आंबोली हे गाव आहे. महामार्गाच्या दुतर्फा हॉटेल्सची संख्याही जास्त आहे. काही वर्षांपूर्वी चारोटी येथील घडलेल्या टँकर स्फोटाच्या आठवणी स्थानिकांनी बोलून दाखवल्या.