नालासोपाऱ्यात भिंत कोसळून सहा मजूर जखमी; पेल्हारच्या चौधरी कंपाऊंडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 22:49 IST2024-02-27T22:48:29+5:302024-02-27T22:49:15+5:30
वसईतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

नालासोपाऱ्यात भिंत कोसळून सहा मजूर जखमी; पेल्हारच्या चौधरी कंपाऊंडमधील घटना
मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: पेल्हार गावातील चौधरी कंपाऊंड येथील एका अनधिकृत बांधकामाची मंगळवारी संध्याकाळी भिंत कोसळून सहा मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे वसईतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हा अपघात घडल्यानंतर पेल्हार परिसरात खळबळ माजली होती. या अपघातात शैलेश शिंगडा, रामू मागे, कल्पेश नगडे, भरत दुमादा आणि जयेश ही जखमींची नावे आहेत तर दशरथ लहाडा याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भर्ती करण्यात आले आहे. पेल्हार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बघ्यांची गर्दी कमी करून जमावाला शांत केले आहे.