रिक्षा सापडली आचारसंहितेच्या पेचात; भाजपाकडून तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 01:00 AM2019-04-23T01:00:26+5:302019-04-23T01:00:58+5:30

मतदान केंद्रापासून २०० मीटरचा भाग हा प्रतिबंधित, रिक्षावाल्यांना फटका

Rickshaw found out for the Code of Conduct; Complaint from BJP | रिक्षा सापडली आचारसंहितेच्या पेचात; भाजपाकडून तक्रार

रिक्षा सापडली आचारसंहितेच्या पेचात; भाजपाकडून तक्रार

googlenewsNext

- हितेन नाईक 

पालघर: बहुजन विकास आघाडीला रिक्षा चिन्ह मिळाल्याने मतदानाच्या दिवशी सर्व रिक्षाची वाहतूक बंद ठेवण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी एकी कडे केल्याने रिक्षा चालकामधून तीव्र संताप व्यक्त केला जात असताना दुसरी कडे दिव्यांग, जेष्ठ नागरिक आणि रु ग्णांना मतदान केंद्रा पर्यंत नेण्यात येणाºया रिक्षावर निवडणूक निर्णय अधिकाºया कडून ही मज्जाव करण्यात येणार असल्याने जेष्ठांना मतदान केंद्रा पर्यंत पोचायला अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे.

बहुजन विकास आघाडीकडून शिट्टी हे चिन्ह भाजप-सेनेच्या प्रयत्नाने हिसकावून घेतल्या नंतर बविआ उमेदवार बळीराम जाधव यांना रिक्षा चिन्ह मिळाल्याने मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व रिक्षा बंद ठेवण्याची मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार शुक्ला यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या कडे केली आहे. बहुजन विकास आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक बिथरले असून उद्या आम्हाला रेल्वे इंजिन चिन्ह मिळाले असते तर सर्व रेल्वे सेवा बंद ठेवली असती का? असा प्रश्न आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित करून कमळ, घड्याळ, हाताचा पंजा, या चिन्हा बाबत काय? असा उपप्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे.

आरटीओकडून जिल्ह्यात सुमारे ३३ हजार रिक्षाचीं नोंद करण्यात आली असून गरीब रिक्षाधारकांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह रिक्षावर चालत असतो. आज हजारो रिक्षाचा वापर प्रचारासाठी केला जात असून या व्यवसायातून चांगले उत्पन्न रिक्षा धारकांना मिळत आहे. तर अनेक दिव्यांग, जेष्ठ नागरिक, रु ग्णांना मतदान केंद्रापर्यंत पोचिवण्यासाठी रिक्षाची व्यवस्था करण्यात येते. मतदान केंद्रा पासून २०० मीटर चा भाग हा प्रतिबंधित भाग म्हणून रेखांकित केला जातो. या प्रतिबंधित भागा मध्ये प्रचार करण्यास, उमेदवारी चिन्ह नेण्यास, मतदारांना प्रभावीत करण्यास निवडणूक निर्णय विभागाने बंदी घातली आहे.

वसई, विरार तसेच अन्य भागात मोठ्या प्रमाणात रिक्षा ची वाहतूक सुरू असत. त्यात बविआ चे कार्यकर्ते या दरम्यान मतदारांना आॅटो रिक्षा दाखवून त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील अशी तक्रार शुक्ला यांनी केली आहे. दरम्यान, आ. ठाकूर यांनीही सर्वसामान्यांची ओळख असा रिक्षाचा प्रचार केला आहे. त्यामुळे २९ एप्रिल रोजी होणाºया मतदानाच्या दिवशी सर्व रिक्षा प्रतिबंधित भागाच्या बाहेर ठेवाव्यात अथवा त्यादिवशी सर्व रिक्षा बंद ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नारनवरे यांची भेट घेत विचारले असता प्रतिबंधित भागापर्यंत वाहने नेण्यास यापूर्वीही बंदी होती आणि ती आताही राहणार आहे.भाजपच्या पदाधिकाºया कडून आमच्या व्यवसायावर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्ह्यातील सर्व रिक्षाधारक रस्त्यावर उतरून आंदोलन उभारू अश्या प्रतिक्रि या रिक्षाधारका कडून व्यक्त केल्या जात आहेत.

तीन हजार २०० जणांची नोंद सर्वच पक्षांसमोर ठरणार आव्हान
निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार ज्या मतदारांना मतदान केंद्रा पर्यंत पोचण्यास त्रास होत असेल अशा ३ हजार २०० मतदारांची नोंद मतदान यादी वरून करण्यात आली असून व्हीलचेअर वरून त्यांना मतदान केंद्रा पर्यंत नेण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.
सातपाटी सह किनारपट्टीवरील अनेक गावातील मतदान केंद्रा समोर मोठया वाळूचे ढीग असल्याने व्हील चेअर चा उपयोग होणार नसल्याने आणि रिक्षांना परवानगी नसल्याने मतदानासाठी आलेल्या अनेक जेष्ठ नागरिक, दिव्यांग,आजारी रु ग्णांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Web Title: Rickshaw found out for the Code of Conduct; Complaint from BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.