पालघरमधील वाढलेला मतदानाचा टक्का कुणाच्या पारड्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:07 PM2019-04-30T23:07:08+5:302019-04-30T23:07:38+5:30

१०.५ टक्के मतदान वाढले : १२ लाख १ हजार २९८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

In Palghar, what is the percentage of increased voting percentage? | पालघरमधील वाढलेला मतदानाचा टक्का कुणाच्या पारड्यात?

पालघरमधील वाढलेला मतदानाचा टक्का कुणाच्या पारड्यात?

Next

पालघर : पालघर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत एकूण ६३.७२ टक्के मतदान झाले असून एकूण १८ लाख ८५ हजार २९७ मतदारा पैकी १२ लाख १ हजार २९८ मतदारांनी आपला हक्क बजावला. या प्रक्रीयेद्वारे एकूण १२ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिन्समध्ये बंद झाले असून मे २०१८ मध्ये झालेल्या पोट निवडणुकीत ५३.२२ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे वाढलेल्या १०.५ टक्के वाढलेले मतदान कुणाला फायदेशीर ठरते ह्यावर विजयी उमेदवारांचे गणित जुळणार आहे.

पालघर लोकसभेच्या मे २०१८ च्या पोटनिवडणुकीत एकूण १७ लाख ३१ हजार ७७ एवढे मतदार होते. यावर्षी मतदारांची संख्या वाढून एकूण १८ लाख ८५ हजार २९७ मतदारांची नोंद झाली आहे. त्यात ९ लाख ८८ हजार ९९७ पुरु ष, तर ८ लाख ९६ हजार १८९ महिला तर १११ तृतीय पंथीयांचा समावेश आहे. एकूण मतदारांपैकी १२ लाख १ हजार २९८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून त्यात ६ लाख ४१ हजार १५६ पुरु षांनी (६४.८३ टक्के),तर ५ लाख ६० हजार ११८ महिलांनी (६२.५० टक्के)तर २४ तृतीयपंथी (२१.६२ टक्के) यांचा समावेश आहे.

पालघर लोकसभेचे खासदार चिंतामण वणगा यांच्या अकस्मात मृत्यू नंतर मे २०१८ मध्ये झालेल्या पोट निवडणुकीत एकूण ५१.४४ टक्के मतदान झाले होते. यावेळी एकूण ६३.७२ टक्के मतदान झाल्याने यावेळी एकूण १२.२८ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे हे वाढलेले मतदान कुणाच्या फायद्याचे हे २४ मेला कळेल.

विधानसभानिहाय मतदान
डहाणू विधानसभा क्षेत्रातील एकूण २ लाख ६९ हजार ९८८ मतदारांपैकी ९० हजार ८०३ पुरु षांनी तर ९० हजार ४४७ महिलांनी तर अन्य दोन तृतीयपंथीयांनी मतदान केले यावेळी मतदानाची टक्केवारी ६७.१३ इतकी भरली.

विक्रमगड मतदारसंघातील २ लाख ६४,१३२ मतदारांपैकी ९५,५६७ पुरु षांनी तर ८८ हजार १७ महिलांनी अशा एकूण १ लाख ८३ हजार ५८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांची टक्केवारी ६९.५० टक्के इतकी भरली.

पालघर विधानसभा मतदार संघातील संघात २ लाख ७१ हजार १६७ मतदारांपैकी ९७ हजार ६६३ पुरु ष तर ८८ हजार २७० महिलांनी तर १० तृतीयपंथीयांनी अशा एकूण १ लाख ८५ हजार ९४३ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला एकूण ६८.५७ टक्के मतदान झाले.

बोईसर विधानसभा मतदार क्षेत्रात एकूण २ लाख ९७ हजार ९१५ इतके मतदार असून त्यापैकी १ लाख ११ हजार ५५० पुरु ष तर ९२ हजार ४९४ महिला व ५ तृतीयपंथी मिळून २ लाख ४ हजार ४९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी एकूण ६८.४९ टक्के मतदान झाले.

नालासोपारा विधानसभा मतदार क्षेत्रात एकूण ४ लाख ८७ हजार ५६० मतदार असून १ लाख ४४ हजार ४०२ पुरु ष तर १ लाख ९ हजार ९०५ महिलांनी तर ६ तृतीयपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला तिथे ५२.१६ टक्के मतदान झाले.

वसई विधानसभा मतदार क्षेत्रात २ लाख ९४ हजार ५३५ मतदार असून त्यापैकी १ लाख ११ हजार ७१ पुरु ष तर ९० हजार ९८५ महिला तर अन्य एक तृतीयपंथी अशा एकूण १ लाख ९२ हजार १५७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यात ६५.२४ टक्के मतदान झाले.

Web Title: In Palghar, what is the percentage of increased voting percentage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.