नालासोपाऱ्यात उघड्या डीपी बॉक्समधील विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 17:47 IST2023-07-03T17:44:29+5:302023-07-03T17:47:04+5:30
प्रगती नगरच्या सम्राट बिल्डिंग नंबर ३ येथे राहणारे आशिष द्वारकानाथ शर्मा हे रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास रस्त्याने चालत होते.

नालासोपाऱ्यात उघड्या डीपी बॉक्समधील विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू
मंगेश कराळे
नालासोपारा :- प्रगतीनगर परिसरातील उघड्या डीपी बॉक्समधील विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ही घटना जवळच बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेप्रकरणी तुळींज पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
प्रगती नगरच्या सम्राट बिल्डिंग नंबर ३ येथे राहणारे आशिष द्वारकानाथ शर्मा (३३) हे रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास रस्त्याने चालत होते. त्यावेळी त्यांची चप्पल स्लिप झाली व समोर असणाऱ्या लाईटचा लाल कलरच्या मिनी पिलरला हात लागल्याने करंट लागल्याने बेशुद्ध अवस्थेत पडला. त्यांना स्थानिक नागरिकांनी दवाउपचारासाठी मनपाच्या विजय नगर येथील मनपा रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासून आशिष यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. ही घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
शहरांमध्ये अनेक ठिकाणी काही महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला, गल्ल्यांमध्ये, उघड्या मैदानात तर काही सोसायटीच्या आवारात विजेचे डीपी बॉक्स आणि ट्रान्सफार्मर उघडे असल्यामुळे महावितरण डोळेझाक करत असल्याचे उघड झाले आहे.