वसई विरार मनपाच्या महापौरपदी अजीव पाटील, तर उपमहापौरपदी मार्शल लोपीस यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 19:16 IST2026-02-03T19:15:24+5:302026-02-03T19:16:18+5:30

महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत बविआच्या उमेदवारांना सभागृहातील बहुमताचे पाठबळ मिळाले. निवडीनंतर सभागृहात बविआच्या नगरसेवकांनी शिट्टी वाजवून जल्लोष केला.

Ajeev Patil elected as Mayor of Vasai Virar Municipal Corporation, while Marshall Lopis elected as Deputy Mayor | वसई विरार मनपाच्या महापौरपदी अजीव पाटील, तर उपमहापौरपदी मार्शल लोपीस यांची निवड

वसई विरार मनपाच्या महापौरपदी अजीव पाटील, तर उपमहापौरपदी मार्शल लोपीस यांची निवड

- मंगेश कराळे

लोकमत न्यूज नेटवर्क,

नालासोपारा :- वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने आपले वर्चस्व कायम राखले आहे. मनपाच्या ७ व्या महापौरपदी बविआचे अजीव पाटील तर उपमहापौरपदी मार्शल लोपीस यांची मंगळवारी निवड करण्यात आली. महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत बविआच्या उमेदवारांना सभागृहातील बहुमताचे पाठबळ मिळाले. निवडीनंतर सभागृहात बविआच्या नगरसेवकांनी शिट्टी वाजवून जल्लोष केला.

मंगळवारी सकाळी मनपा मुख्यालयात महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी अतिरिक, आयुक्त संजय हेरवाडे आणि दिपक सावंत, उपायुक्त अजित मुठे, स्वाती देशपांडे, निवडणूक सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर, यांच्यासह मनपातील अनेक अधिकारी, कर्मचारी, अनेक पक्षांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

छाननीत महापौर पदाची ४ नामनिर्देशन पत्र वैध ठरली. निषाद चोरघे, प्रफुल साने यांनी महापौर पदाचा अर्ज मागे घेतला आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनंती केली. १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. मात्र भाजपने माघार न घेता निवडणूक केली. भाजपाच्या ऍड दर्शना त्रिपाठी यांना ४४ तर अजीव पाटील यांना ७१ मते मिळाली. तर उपमहापौर मार्शल लोपीस यांना ७१ तर भाजपचे नारायण मांजरेकर यांना ४४ मते मिळाली.

नवनिर्वाचित महापौर अजीव पाटील यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार असून पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, स्वच्छता आणि नागरी सुविधा अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला. उपमहापौर मार्शल लोपीस यांनी महापौरांसोबत समन्वयाने काम करून नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. 

मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षाच्या भूमिकेत बसलेल्या भाजपाच्या 'मिशन लोटस' तसेच नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार पाटील यांनी या निवडणुकीच्या पूर्वी केलेले सूचक वक्तव्य याचा कुठलाच प्रत्यय आला नाही. त्यामुळे भाजपा बहुजन विकास आघाडी पुढे निष्प्रभ झाल्याचे दिसून येते विरोधी बाकावर ती ४४ नगरसेवक हीच या सभागृहात जमेची बाजू ठरणार आहे.

सहा वेळा नगरसेवक ते महापौर 

तब्बल सहा वेळा नगरसेवक, बविआचे संघटक सचिव, मुरब्बी राजकारणी, पत्रकारांचे चांगले मित्र, दांडगा अनुभव, प्रथम महापौर राजीव पाटील यांचे बंधू असलेले अजीव पाटील यांची मंगळवारी महापौरपदी निवड झाली आहे.

Web Title : बहुजन विकास अघाड़ी ने वसई विरार महापौर, उपमहापौर पद जीते।

Web Summary : अजीव पाटिल वसई विरार के महापौर, मार्शल लोप्स उपमहापौर चुने गए। बहुजन विकास अघाड़ी का दबदबा बरकरार। पाटिल ने पानी, सड़कों और स्वच्छता पर ध्यान केंद्रित करने का वादा किया। भाजपा की चुनौती विफल।

Web Title : Bahujan Vikas Aghadi wins Vasai Virar mayoral, deputy mayoral posts.

Web Summary : Ajiv Patil elected Vasai Virar mayor, Marshal Lopes deputy mayor. Bahujan Vikas Aghadi retains control. Patil pledges focus on water, roads, and sanitation. BJP's challenge falters.